Team Agrowon
कांदा पिकावरिल करपा रोगाचे जांभळा, काळा आणि तपकिरी असे तीन प्रकार आहेत.
जांभळा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानावर सुरवातीला लांबट पांढुरके चट्टे पडतात.
काळा करपा रोगामध्ये सुरुवातीला पानाची बाह्य बाजू व बुडख्याजवळ राखाडी रंगाचे ठिपके आढळतात.
तपकिरी करपा रोगामध्ये पिवळसर,तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.
रोगाच्रोया नियंत्रणासाठी रोप गादी वाफ्यावर तयार करावीत. वाफ्यामध्ये पाणी साचू देऊ नये.
एका शिवारात सर्व शेतकऱ्यांनी फवारणी एका ठराविक काळात केली तर रोगाच नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकत.