Team Agrowon
फुल किड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास फुल किड्यांची पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात.
रोपावस्थेतील प्रादुर्भावामुळे पाने वाळून कांदे पोसत नाहीत. कांदा तयार होत असताना प्रादुर्भाव झाल्यास माना जाड होतात.
फुलकिड्यांनी खाल्लेल्या भागातून काळा करपा किंवा जांभळा करपा या रोगाच्या बुरशी पानात शिरकाव करतात.
फुलकिडे पिवळसर तपकिरी असून, शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे असतात.
फुलकीडीने रस शोषून घेतल्यामुळे पानावर पांढुरके ठिपके पडतात. त्यालाच टाक्या या नावाने ओळखल जात.
फुलकीड कांदा पिकाच्या सर्व अवस्थेत येणारी व सर्वाधिक नुकसान करणारी प्रमुख कीड आहे.