Cotton Sowing : चार लाख हेक्टरवर कापसाची लागवड

Kharif Season 2023 : जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक चार लाख ४५ हजार ७४७ हेक्टरवर लागवड झाली आहे. पेरण्या सुरूच आहेत. मात्र त्यात पावसामुळे अडथळा येत आहे.
Cotton Sowing
Cotton SowingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक चार लाख ४५ हजार ७४७ हेक्टरवर लागवड झाली आहे. पेरण्या सुरूच आहेत. मात्र त्यात पावसामुळे अडथळा येत आहे. जिल्ह्यात जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना आता वेग आला आहे.

जिल्ह्यात आज‌अखेरपर्यंत पाच लाख ५४ हजार ६७५ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या. पेरण्यांचे प्रमाण एकूण सरासरी क्षेत्राच्या ७२ टक्के आहे. यंदाच्या खरिपात सर्वाधिक पेरण्या जामनेर तालुक्यात ६८ हजार १९ हेक्टरवर झाल्या. कपाशीच्या चार लाख ४५ हजार ७४७ हेक्टरवर सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत.

Cotton Sowing
Cotton Sowing: कापूस लागवडीत मोठी घट; कोणत्या राज्यात कमी पेरा?

जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र सात लाख ६९ हजार ६०१ हेक्टर आहे. यंदा जून कोरडा गेला. कापूस लागवडीस उशीर झाला. मात्र, जुलैपासून चांगला पाऊस होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून पेरण्यांना गती आली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधान्य, तूर, मूग, उडीद, इतर कडधान्य, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, इतर गळीत धान्य, कपाशी आदी प्रमुख पिके घेतली जातात.

Cotton Sowing
Cotton Sowing : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर कपाशी लागवड

पीकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर)

पीक-- क्षेत्र--टक्के

कपाशी--४ लाख ४५ हजार ७४७--८९

मका--५१ हजार १५६--६०

ज्वारी--१३ हजार ९९--२९

सोयाबीन--९ हजार ५६--३१

बाजरी--५ हजार ४७०--३५

इतर तृणधान्य--४४५--२१

तूर--५ हजार १५५-३१

मूग--८ हजार ६६५-- ३१

उडीद--७ हजार १२३--२७

इतर कडधान्य--१८२--७

भुईमूग--४११-१४

तीळ--१५२--८

सूर्यफूल--१४--२३

पेरणी झालेले तालुकानिहाय क्षेत्र (हेक्टर)

तालुका--क्षेत्र--टक्केवारी

जळगाव--२५,०२६--४४

भुसावळ--२२,२१४--७७

बोदवड--३२,९४९--९९

यावल--३३,७२९--७८

रावेर--१६,५७०--५६

मुक्ताईनगर--१४,५६६--४९

अमळनेर--५०,०८९--७२

चोपडा--५४,१४६--८५

एरंडोल--२९,९९०--७६

धरणगाव--१९,२६७--४३

पारोळा--४२,४५९--८२

चाळीसगाव--६२,३७०--७२

जामनेर--६८,०१९--६८

पाचोरा--५३,२७३--९२

भडगाव--३०,०९७--८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com