Bird Flu : राज्यात ‘बर्ड फ्लू’चा कोणताही धोका नाही

Poultry Industry : राज्यात गेल्या वर्षी परसातील कुक्‍कुटपक्षी, पाणवठ्यावर येणारे, प्राणिसंग्रहालय, जंगल अशा विविध ठिकाणांवरून २३३९३ प्राणी, पक्ष्याचे नमुने रॅन्डम पद्धतीने संकलित करून त्याचे पृथक्करण करण्यात आले.
Poultry
PoultryAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : राज्यात गेल्या वर्षी परसातील कुक्‍कुटपक्षी, पाणवठ्यावर येणारे, प्राणिसंग्रहालय, जंगल अशा विविध ठिकाणांवरून २३३९३ प्राणी, पक्ष्याचे नमुने रॅन्डम पद्धतीने संकलित करून त्याचे पृथक्करण करण्यात आले. यातील एकाही पक्ष्यामध्ये बर्ड फ्लू (एच ५ एन १) या रोगाचा प्रादुर्भाव आढळला नाही. परिणामी, राज्यात ‘बर्ड फ्लू’चा कोणताही धोका नाही, असा स्पष्टोक्‍ती पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आली आहे.

राज्यात सध्या पोल्ट्री व्यवसाय स्थिर असताना तो अस्थिर करण्याच्या उद्देशाने ‘बर्ड फ्लू’च्या अफवा पसरविण्यात येत आहेत. त्याची दखल घेत पशुसंवर्धन विभागाकडून एका प्रसिद्धी पत्रकान्वये हा खुलासा करण्यात आला. पत्रकानुसार, महाराष्ट्रात २००६ मध्ये नवापूर (जि. नंदुरबार) येथे पहिल्यांदा ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव आढळून आला होता.

Poultry
Poultry Manure : सेंद्रीय शेतीसाठी कोंबडी खत बेस्ट पर्याय

त्यानंतर २०२१ आणि २०२२ मध्ये आढळून आलेल्या रोग प्रादुर्भावातही विषाणूचा स्ट्रेन एच ५ एन १ हाच होता. केंद्र शासनाच्या ‘बर्ड फ्लू’ आराखड्यानुसार या रोगाचा प्रादुर्भाव अभ्यासण्यासाठी पक्ष्यांचे रॅंडम निरीक्षण व तपासणी होते.

Poultry
Poultry Diseases : कोंबड्यांमधील आजार रोखण्यासाठी जैवसुरक्षेचे उपाय

त्यानुसार २३ हजार ३९३ पक्ष्यांच्या तपासणीत या विषाणूचा प्रादुर्भाव आढळून आला नाही. त्यामुळे सध्या राज्यात ‘बर्ड फ्लू’चा कोणताही धोका नाही.

तरी सुद्धा राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित पक्ष्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त आढळल्यास याबाबत नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास कळवावे, असे आवाहनही पशुसंवर्धन खात्याकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com