Team Agrowon
यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने नैसर्गिक, सेंद्रीय शेतीला विशेष महत्त्व दिले आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात निधीची विशेष तरतूदही केली आहे.
सध्या अनेक शेतकऱ्यांचा सेंद्रीय शेतीकडे कल वाढल्याचे दिसत आहे. सेंद्रीय शेतीसाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय खतांचा वापर केला जातो.
कोंबडी खताच्या वापरामुळे जमिनीची जलधारणा शक्ती वाढते. जमिनीचा पोत सुधारतो. पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.
कोंबडी खतामध्ये मुख्यतः १३ अन्नद्रव्ये असतात. सध्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे.
बऱ्याच प्रकारची सेंद्रिय खते उपलब्ध आहेत. त्यामध्ये कोंबडी खत हा उत्तम पर्याय आहे. कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते.
सेंद्रिय खताचा वापर वाढवल्याने रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्क्यांपर्यंत बचत होते.
कोंबडी खताचा वापर हा बागायती शेतीत चांगला होतो. ऊस, फळपिके आणि फुलझाडे कोंबडी खतास चांगला प्रतिसाद देतात.
कोंबड्यांची विष्ठा, कोंबड्यांच्या लिटरसाठी वापरलेला लाकडाचा भुस्सा, साळीचा भुस्सा, शेंगाची टरफले इ. सर्व घटक कुजल्यानंतर तयार झालेला पदार्थ म्हणजे कोंबडी खत.
साधारणतः एक हजार कोंबड्यांपासून वर्षाला १४ टन एवढे खत तयार होते. खताचे महत्त्व कोंबडी खतामध्ये मुख्यतः १३ अन्नद्रव्ये असतात.
कोंबडी खतामध्ये नत्र व स्फुरद जास्त प्रमाणात असते. कोंबडी खतातील नत्र हे अमोनिया, नायट्रेट, युरिक ॲसिड या प्रकारांत आढळते.