Team Agrowon
कोंबड्यांचे शेड असलेली जागा फेन्सिंग करून सुरक्षित करावी. प्रवेशाच्या ठिकाणी “प्रतिबंधित क्षेत्र” म्हणून फलक लावावेत.
कोंबड्यांची शेड लोकवस्ती, तसेच इतर पोल्ट्री फार्मपासून दूर, उंचावर बांधावी.
कोंबड्यांच्या शेडच्या अवतीभोवती बिनकामाची झाडे किंवा झुडपे नसावी. जेणेकरून जंगली पक्ष्यांची घरटी नसावीत.
अवांतरित लोकांची शेडमध्ये ये- जा प्रतिबंधित करून त्याची योग्य नोंद ठेवावी.
प्रत्येक शेडमध्ये कामगारांसाठी वेगळे पादत्राणे तसेच कपडे उपलब्ध करून द्यावेत.
प्रत्येक शेडच्या सुरुवातीला स्वच्छ फूटबाथ असावेत. मृत कोंबडी काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी (जाळणे, खोल खड्ड्यात पुरावे)
दुसऱ्या शेडला किंवा आजाराचा प्रसार असलेल्या शेडला भेट दिल्यानंतर स्वतःच्या शेडमध्ये जाऊ नये.