जळगाव ः खानदेशात २०१९ व २०२० मध्ये अतिपावसात (Heavy Rain) अतोनात पिकहानी (Crop Damage) झाली. यासंबंधी सरसकट पंचनामे करून मदत ()Compensation मंजूर झाली. परंतु अनेक तालुक्यांना ही मदत अजूनही मिळाली नसल्याची स्थिती आहे.
जळगाव जिल्ह्यात २०१९ व २०२० मध्ये अतिवृष्टीत नुकसानीसंबंधीचे अनुदान जळगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, नंदुरबार या तालुक्यांत अप्राप्त आहे. फक्त काही तालुक्यांतच काही महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना हा निधी मिळाला आहे. त्या वेळेस आघाडी सरकार होते. आता सत्तांतर होऊन नवे सरकार आले, परंतु निधी मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
खानदेशात मागील चार वर्षे अतिवृष्टी झाली आहे. परंतु २०२१ व २०२२ मध्ये नुकसानीसंबंधी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हे पात्र ठरले नाहीत. नुकसान ५० टक्क्यांवर झाले नसल्याचा आणि पुढे पैसेवारी नुकसान पातळी नसल्याची सांगणारी जाहीर झाली.
यामुळे या दोन वर्षांत खानदेशला मदतीच्या यादीतून वगळण्यात आले. २०१९ मध्ये अमळनेर तालुक्यातील काही महसूल मंडळांना मध्यंतरी मदत मंजूर झाली. परंतु मदतीची रक्कम काही शेतकऱ्यांनाच मिळाली. यंदाही मोठे नुकसान अतिवृष्टीत कापूस, ज्वारी, मका पिकाचे झाले. परंतु शासन, प्रशासनाने नुकसान ३० टक्क्यांवरही नसल्याचा दावा केला.
शेतकऱ्यांमध्ये नाराजी
२०२२ मध्ये जळगाव जिल्ह्यात भडगाव, पाचोरा, जळगाव, चोपडा या भागातील काही गावांत ढगफुटीसदृश पाऊसही झाला होता. जळगाव तालुक्यात पिंप्राळा व भोकर महसूल मंडलांत काही तासांत ६५ मिलिमीटर व ९० मिलिमीटरवर पाऊस झाला होता. परंतु तरीदेखील सरसकट पंचनामे प्रशासनाने केले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
रब्बीचे नियोजन कोलमडले
या मदतीबाबत शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदने दिली. परंतु शासन दखल घेत नाही. यंदा अतिपावसात पूर्वहंगामी कापूस पिकाचे उत्पादन काही शेतकऱ्यांना कमी मिळाले. पुरेसा निधी हाती नसल्याने रब्बीचे नियोजन कोलमडले आहे. अशात प्रशासनाने या बाबत गांभीर्याने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.