Solapur APMC : मार्केट यार्डातील शेतमाल अडत बाजार ओस

Agriculture News : सोलापूर मार्केट यार्डामधील शेतमाल आडत विभागाचे अर्धे वर्ष जवळपास वाया गेल्यात जमा आहे. या प्रकाराने व्यापारी देखील हवालदील झाले आहेत. कर्नाटक व मराठवाडा असा दोन्ही बाजूने शेतमालाच्या आवकीचा फटका यार्डातील व्यापाराला बसला आहे. स्थानिक भागाचीदेखील हीच स्थिती आहे.
Solapur APMC
Solapur APMCAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर  येथील हैदराबाद रस्त्यावरील सिद्धेश्वर मार्केट यार्डमधील रस्त्यावर विरळ झालेली शेतमालाच्या वाहनांची वर्दळ.....लिलावासाठी उपलब्ध नसलेला शेतमाल... मराठवाडा व कर्नाटकमधून येणारी आवक पूर्णपणे थांबलेली... या आणि अशा एकूण या परिस्थितीत दुष्काळाच्या गडद छायेत सोलापूरचा आंतरराज्य बाजार व दक्षिण भारतातील व्यापारासाठी प्रसिद्ध असलेला सोलापूर येथील मार्केट यार्डमधील शेतमाल अडत बाजार अक्षरशः सुनसान झाला आहे.

Solapur APMC
Drought Condition : भोकरदनमध्ये दुष्काळ जाहीर करा ; शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

सोलापूरचे मार्केट यार्ड कर्नाटक, आंध्रप्रदेश तेलंगण व मराठवाड्याशी शेतीमालाच्या अर्थकारणाने जोडले गेले आहे. यार्डचा हंगाम जून व जुलैपासून सुरु होतो. सुरवातीला कर्नाटकातील मुगाची आवक सुरु होते. कर्नाटकात मे महिन्यात पाणीदेऊन मुगाची लागवड होते. जुलै अखेरीस येथील मूग बाजारात येतो. पण यावेळी पावसानेदेखील इंडी, विजयपूर या भागातील पिकांना फटका बसला आहे.

Solapur APMC
Lumpy Virus : सोलापूर जिल्ह्यात जनावरांचे बाजार भरविण्यास मनाई

हंगामातील सर्वात पहिली मुगाची आवक झालीच नाही. त्या पाठोपाठ मराठवाड्यातील व स्थानिक आवक सुरु होते. पण पावसाअभावी ही आवक देखील झालीच नाही. त्यापाठोपाठ उडीदाची स्थितीदेखील अशीच झाली. अगदी बोटावर मोजण्याइतक्या पोत्यांची कशीबशी आवक झाली. पण नंतर उडीददेखील मिळेनासा झाला. शेत मालकाची आवकच नसल्याने  खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

यानंतर सोयाबीनचा हंगाम सुरू होतो. पण पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे आता पाऊस पडला नाही तर सोयाबीन देखील जाणार असे मानले जाते. जरी उशिरा पाऊस झाला तरी उतारा कमी पडणार. तुरींनी माना टाकायला सुरवात केली आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनावर प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे खरीप हंगामात कोणत्याच शेतमालाची आवक होईल, असे दिसत नाही.

मार्केट यार्डामधील शेतमाल आडत विभागाचे अर्धे वर्ष जवळपास वाया गेल्यात जमा आहे. या प्रकाराने व्यापारी देखील हवालदील झाले आहेत. कर्नाटक व मराठवाडा असा दोन्ही बाजूने शेतमालाच्या आवकीचा फटका यार्डातील व्यापाराला बसला आहे. स्थानिक भागाचीदेखील हीच स्थिती आहे.

यावर्षी मूगाची आवक झालेली नाही. उडीदाची आवक अगदी किरकोळ आहे. पावसाअभावी शेतमालाची आवक घटत चालली आहे. उशिरा पावसाने खरिपाचे नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे हा हंगामात शेतमाल व्यापार घटला आहे.
- महादेव मठपती, व्यापारी, मार्केट यार्ड, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com