Lumpy Virus : सोलापूर जिल्ह्यात जनावरांचे बाजार भरविण्यास मनाई

Lumpy Skin Disease : सोलापूर जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढला. जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Lumpy Virus
Lumpy VirusAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्याला नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांनी जिल्ह्यातील जनावरांचे आठवडे बाजार बंद करण्याचे आदेशदेखील मंगळवारी (ता. २२) दिले आहेत. तसेच गाय आणि बैलांच्या वाहतुकीवरही निर्बंध घातले आहेत.

Lumpy Virus
Lumpy Skin : सोलापूर जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ बाधित ४६७ जनावरे

जिल्ह्यातील लम्पी स्कीनसंबंधी आढावा बैठक आव्हाळे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. ‘लम्पी स्कीन’वर (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मूलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरांची, ज्या ठिकाणी ते पाळले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास पूर्ण मनाई करण्यात येत आहे.

तसेच गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधित प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी, अन्य कोणताही भाग, उत्पादन, असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी या आदेशाद्वारे पूर्ण मनाई करण्यात आली आहे.

Lumpy Virus
Lumpy Skin : सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीनचा वाढता प्रादुर्भाव

गोजातीय प्रजातीच्या गुरांचा कोणताही बाजार भरवणे, शर्यती लावणे, जत्रा भरविणे, प्रदर्शन आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम घेणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.

नियंत्रित क्षेत्राबाहेरील कोणतेही जनावर ‘लम्पी स्कीन’च्या लसीकरणाचे एप्रिल २०२३ किंवा त्यानंतरचे प्रमाणपत्र असल्याशिवाय आणि ही लस घेऊन किमान २८ दिवस झालेले असल्याशिवाय या नियंत्रित क्षेत्रात आणण्यास बंदी करण्यात येत आहे, असेही स्पष्टीकरण या आदेशात देण्यात आले.

...तर गुन्हा दाखल करणार

या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधींविरुद्ध नियमांनुसार गुन्हा दाखल करणे, तसेच कारवाई प्रस्तावित करण्यासाठी त्या -त्या संबंधित कार्यक्षेत्रातील पशुधन विकास अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असेही या आदेशात नमूद केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com