Rajesh Kumar
Rajesh KumarAgrowon

Post Harvest Technology : शेतकऱ्यांसाठी ‘एनआयपीएचटी’विविध जिल्ह्यांत शाखा सुरू करणार

Post Harvesting Processing : राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. दूरच्या प्रशिक्षणार्थीना लाभ मिळण्यासाठी संस्थेने समाज माध्यमाचा वापर वाढवावा.
Published on

Pune News : राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेने (एनआयपीएचटी) संस्था स्वबळावर उभी करण्यासाठी उत्पन्नाची नवीन साधने शोधावीत, तसेच राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांना त्यांच्याच भागात प्रशिक्षण देण्यासाठी विविध जिल्‍ह्यांमध्ये शाखा सुरू करून, नावीन्यपूर्ण प्रशिक्षण सुरू करावे, अशी सूचना सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी दिल्या.

Rajesh Kumar
Agriculture Technology : तंत्रज्ञान वापराचे स्वागत, पण...

राजेशकुमार यांनी तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, सुगीपश्‍चात संस्थेचे संचालक डॉ. सुभाष घुले, विश्वास जाधव आदी उपस्थित होते.

Rajesh Kumar
Agriculture Technology : कीडमुक्त शेतमालासाठी नव्या तंत्रज्ञानावर काम आवश्यक

राजेश कुमार म्हणाले, ‘‘राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. दूरच्या प्रशिक्षणार्थीना लाभ मिळण्यासाठी संस्थेने समाज माध्यमाचा वापर वाढवावा. ‘मॅग्नेट’ प्रकल्पातून संस्थेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामकाजासाठी काही घटक घेता येतील का, याचाही विचार करावा. राज्यात काही ठिकाणी संस्थेच्या शाखा सुरू करता येतील का याचीही चाचपणी करण्यात यावी,’’ अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

श्री. कोकरे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. संस्थेत १३ विषयांवरील प्रशिक्षण देण्यात येत असून आजपर्यंत संस्थेने ६१ हजार ३०० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान ही संस्था पणन मंडळाने १९९८ मध्ये स्थापन केली असून बाहेरच्या राज्यातील प्रशिक्षणार्थीही मोठ्या प्रमाणात येथे प्रशिक्षणासाठी येत असतात, अशी माहिती श्री. कदम यांनी दिली. डॉ. घुले यांनी राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या कामकाजाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी राजेशकुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com