Narendra Modi : विरोधकांचे नकारात्मक राजकारण

India Politics : सध्या संपूर्ण देश भ्रष्टाचार, घराणेशाही व तुष्टीकरणाविरुद्ध ‘भारत छोडो’चा नारा देत आहे, असे म्हणत विरोधकांवर नकारात्मक राजकारणाचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. ६) केला.
Narendra Modi
Narendra ModiAgrowon

सध्या संपूर्ण देश भ्रष्टाचार, घराणेशाही व तुष्टीकरणाविरुद्ध ‘भारत छोडो’चा नारा देत आहे, असे म्हणत विरोधकांवर नकारात्मक राजकारणाचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. ६) केला.

देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा भूमिपूजन समारंभानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी संबोधित केले. २४,४७० कोटी रुपये खर्चून या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात असून, प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळतील.

स्वत:ही काम करायचे नाही आणि दुसऱ्यांनाही करू द्यायचे नाही, या तत्त्वावर विरोधक काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, की संसदेची आधुनिक इमारत बांधण्यात आली असून, विरोधक या इमारतीलाही विरोध करत आहेत. प्रत्यक्षात संसदेची ही इमारत सरकार तसेच विरोधी पक्षांचेही प्रतिनिधित्व करते. विरोधकांनी या इमारतीप्रमाणे कर्तव्यपथाच्या विकासालाही विरोध केला.

गेल्या ७० वर्षांत विरोधकांनी साधे युद्ध स्मारकही उभारले नाही, मात्र आम्ही ते उभारले तेव्हा त्याला विरोध करायलाही विरोधकांना शरम वाटली नाही. गुजरातेतील सरदा वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वांत मोठा पुतळा असून सर्व भारतीयांना त्याचा अभिमान आहे.

Narendra Modi
Narendra Modi In USA : मोदींकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महाराष्ट्राच्या गूळाची भेट

काही पक्षांना देशाच्या या पहिल्या केंद्रीय गृहमंत्र्यांची निवडणुकीवेळी आठवण होते, मात्र त्यांचा एकही मोठा नेता पटेलांच्या पुतळ्याला आदरांजली वाहण्यासाठी जात नाही, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला. मोदी म्हणाले, की आम्ही नकारात्मक राजकारणापासून दूर जात पक्षीय राजकारण किंवा मतपेढीचा विचार न करता देशाच्या विकासाचे ध्येय हाती घेतले.

Narendra Modi
Narendra Modi In USA : पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा अमेरिकेत योगाभ्यास

महाराष्ट्रातील या ४४ स्थानकांचा समावेश

परळ, कांजूरमार्ग, विक्रोळी (मुंबई), तळेगाव, आकुर्डी, दौंड (जि. पुणे), कुर्डुवाडी, पंढरपूर, सोलापूर (जि. सोलापूर), श्री. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (जि. कोल्हापूर),

नगर, कोपरगाव (जि. नगर), मनमाड, नगरसूल (जि. नाशिक), छत्रपती संभाजीनगर (जि. छत्रपती संभाजीनगर), जालना, परतूर (जि. जालना),

परभणी, पूर्णा, सेलू, गंगाखेड (जि. परभणी), धाराशिव (जि. धाराशिव), लातूर (जि. लातूर), मुदखेड, किनवट (जि. नांदेड), शेगाव (जि. बुलडाणा), वाशीम (जि. वाशीम), बडनेरा, धामणगाव (जि. अमरावती),

पुलगाव, सेवाग्राम, हिंगणघाट (जि. वर्धा), नरखेड, काटोल, गोधनी (जि. नागपूर), मलकापूर (जि. भंडारा), गोंदिया (जि. गोंदिया), चंद्रपूर, चांदा फोर्ट, बल्लारशाह (जि. चंद्रपूर), वडसा (जि. गडचिरोली).

पुनर्विकास होणारी

५०८ रेल्वे स्थानके

उत्तर प्रदेश ५५

राजस्थान ५५

बिहार ४९

महाराष्ट्र ४४

प. बंगाल ३७

मध्य प्रदेश ३४

आसाम ३२

ओडिशा २५

पंजाब २२

गुजरात २१

तेलंगण २१

ाझारखंड २०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com