Team Agrowon
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांचा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. अमेरिकेत पोहोचल्यावर मोंदींचे भव्य स्वागत करण्यात आले.
दरम्यान, २१ जून हा जागितक योग दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात आयोजिगत योग दिनाच्या कार्यक्रमात मोंदींनी हजेरी लावली.
पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात १३५ देशांच्या प्रतिनिधींसोबत मोदी यांनी योग प्रात्यक्षिके केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी योग कार्यक्रमानंतर लहान मुलांसोबत फोटोसेशनही केले.
दरम्यान, या योग कार्यक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांनी सर्वांसोबत योगाची प्रात्यक्षिके केली. यावेळी त्यांनी विविध आसनेही केली.
या योग दिनाच्या कार्यक्रमात विविध देशांचे नागरिकत्व असलेले लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.