Narendra Modi In USA : मोदींकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महाराष्ट्राच्या गूळाची भेट

PM Narendra Modi Visit To America : अमेरिकेच्या दौऱ्यावर असेलेल्या मोदींनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांना महाराष्ट्रासह दहा राज्यातील विविध वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या.
Narendra Mod
Narendra Mod Agrowon
Published on
Updated on

PM Narendra Modi America Tour : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. तत्पूर्वी अमेरिकेत दाखल होताच मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. वॉशिंगटन येथे मोदी यांनी फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यश्र जो बायडेन यांनी व्हाईट हाऊस येथे मोदींचे स्वागत केले. यावेळी मोदींनी भारतातील विविध राज्यातील वस्तू बायडेन यांना भेट म्हणून दिल्या.

Narendra Mod
Narendra Modi : देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना धोरणांच्या मध्यवर्ती आणले : पंतप्रधान मोदी

अमेरिकेच्या दौऱ्यावर असेलेल्या मोदींनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांना महाराष्ट्रासह दहा राज्यातील विविध वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. यामध्ये जिल बायडेन यांना साडेसात कॅरेटचा एक मौल्यवान हिरवा हिराही भेट देण्यात आला. हा हिरा पर्यावरणपूरक असून तो पृथ्वीवरील ऑप्टिकल आणि रासायनिक गुण दर्शवतो. या हिऱ्याच्या निर्मितीसाठी पवन उर्जा आणि सौर उर्जेचा वापर करण्यात येतो.

महाराष्ट्रातील गूळ भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना मोंदींना महाराष्ट्रासह देशातील दहा राज्यातील विविध वस्तू या भेट म्हणून दिल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील गूळ अमरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेट म्हणून दिला आहे. याशिवाय पंजाबचे तूप, उत्तराखंडचे तांदूळ, तामिळनाडूचे तीळ, कर्नाटकमधील मैसूर येथील चंदन भेट देण्यात आले आहे.

Narendra Mod
Narendra Modi News : पंतप्रधान मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर

तसेच राजस्थानमधील हस्तकलेचा नमुना असलेले २४ कॅरेटचे सोन्याचे नाणे तसेच ९९.५ कॅरेट चांदीचे नाणे भेट देण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील कारागिरांनी तयार केलेले चांदीचे नारळ आणि गुजरातमधील मीठ, गणेशाची मुर्ती आणि निरंजन या वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत.

दरम्यान, आपल्या अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत जागितक योग दिन योग साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात १३५ देशांच्या प्रतिनिधींसोबत योग प्रात्यक्षिके केली. या योग कार्यक्रमाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com