Grape Production : द्राक्ष शेतीसाठी धोरणात्मक निर्णय कळीचे

संपूर्ण राज्यभरात साडेचार लाख हेक्टर वर द्राक्ष बागांचा विस्तार झाला आहे. त्यातून ३५ लाख टन वार्षिक सरासरी उत्पादन हाती येत आहे.
Grape Crop Insurance
Grape Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

नाशिक : संपूर्ण राज्यभरात साडेचार लाख हेक्टर वर द्राक्ष बागांचा विस्तार (Vineyard Expansion) झाला आहे. त्यातून ३५ लाख टन वार्षिक सरासरी उत्पादन (Grape Production) हाती येत आहे. या माध्यमातून जवळपास १० ते १२ लाख घटकांना रोजगार (Employment) मिळत आहे. मात्र गेल्या १० वर्षांत विविध समस्यांनी डोके वर काढले.

Grape Crop Insurance
Grape Bat Attack : रंगीत वाणांच्या द्राक्ष बागांवर वटवाघळांच्या झुंडीचा हल्ला

त्यामुळे द्राक्ष पिकात उत्पादन ते विपणन प्रक्रियेत धोरणात्मक निर्णयांची गरज असल्याचा सूर द्राक्ष उत्पादक शेतकरी, निर्यातदार, द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी, इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेतून समोर आला आहे.

Grape Crop Insurance
Grape : अतिथंडीचे द्राक्ष बागेवरील दुष्परिणाम

मंगळवार (ता. ४) ‘इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स’ या संस्थेच्या संशोधकांनी नाशिक जिल्हा दौरा केला. त्यामध्ये संशोधक सहायक संचित गुप्ता, सहसंशोधक रंजन रॉय, राया दास हे सहभागी होते.

त्यांनी द्राक्ष उत्पादन, द्राक्ष निर्यात धोरण, भारतीय बाजारपेठ व पतपुरवठा या महत्त्वपूर्ण विषयांवर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या ओझर मिग (ता. निफाड) येथील विभागीय कार्यालयात द्राक्ष उत्पादक शेतकरी, निर्यातदार यांच्याशी संवाद साधून ‘द्राक्ष उत्पादन ते विपणन’ या दरम्यान येणाऱ्या समस्या समजून घेतल्या.

या वेळी व्यासपीठावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे रणजित मोहन, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या नेत्या सीमा नरोडे, द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, संघाचे माजी अध्यक्ष अशोकराव गायकवाड उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com