Team Agrowon
द्राक्ष हे पीक थंड हवामानाच्या (Cold Weather) प्रदेशातील असून, तिथे उन्हाळ्यात फळे येतात. आपण उष्ण कटिबंधामध्ये असून आपल्या येथील हिवाळा थंड हवामानाच्या प्रदेशातील उन्हाळ्याप्रमाणे असतो
म्हणून आपण द्राक्षाचे पीक (Grape Crop) हिवाळ्यात घेतो. महाराष्ट्रात नाशिक, सांगली, सोलापूर व पुणे जिल्हा प्रामुख्याने द्राक्ष लागवडीचा (Grape Cultivation) विभाग मानला जातो.
द्राक्षांच्या वाढीसाठी साधारणपणे १५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते.
मात्र गेल्या काही काळामध्ये हवामान बदलाच्या परिणामस्वरूप अतिउष्णता आणि थंडीच्या लाटा दिसून येतात.
त्यांचा विपरीत परिणाम द्राक्ष बागेवर पडतो. तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास द्राक्ष वाढीवर परिणाम होतो.
थंडीच्या लाटा म्हणजेच किमान तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी जाते व दुपारचे तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढते.
जास्त आर्द्रता असताना थंडीची लाट आल्यास सकाळी बराच वेळ धुके राहते.