Horticulture Conference : जैन हिल्स येथे २८ मेपासून राष्ट्रीय फलोद्यान परिषद

Horticulture News : नवी दिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० मे दरम्यान राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचे आयोजन जैन हिल्स येथे करण्यात आले आहे.
Horticulture
Horticulture Agrowon

Jalgaon News : नवी दिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० मे दरम्यान राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचे आयोजन जैन हिल्स येथे करण्यात आले आहे.

विविध फळ पिके, भाजीपाला व अन्नधान्य उत्पादने आदींवर वातावरण बदलाचा होणारा परिणाम त्यावर मात करण्यासाठी आवश्यक विविध तंत्रज्ञान, अचूक पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर शोधनिबंध परिषदेत सादर केले जाणार आहेत. ‘केळीवरील रोगराई व्यवस्थापन व बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती’ या विषयावर २९ मे रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Horticulture
Horticulture Plantation : 'मनरेगा'तून गाठणार ६० हजार हेक्टर फळबाग लागवडीचं उद्दिष्ट

या परिषदेमध्ये एकूण १२ सत्रे असून, जवळपास १०० शास्त्रज्ञ आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे देशभरातील संचालक व शास्त्रज्ञ, देशातील विविध कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञ यांचा सहभाग असणार आहे.

Horticulture
Horticulture Scheme : फळबाग लागवड योजना ; अनुदानासह शेकऱ्यांना देणार मोफत रोपे

या परिषदेमध्ये काही विद्यापीठांचे कुलगुरू व माजी कुलगुरूदेखील उपस्थित असणार आहेत. २८ मे रोजी (कॉनफेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) ‘चाई’चे पुरस्कार दिले जाणार आहेत.

याच शृंखलेत ३० मे रोजी ‘उद्यानरत्न’ पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहेत. संबंधित सर्वांनी परिषदेचा लाभ घ्यावा आणि आपली उपस्थिती नोंदवावी. त्यासाठी ९४२२७७४९४३ व ९४२२७७६९२५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com