Horticulture Plantation : 'मनरेगा'तून गाठणार ६० हजार हेक्टर फळबाग लागवडीचं उद्दिष्ट

Team Agrowon

फळबाग लागवड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगातून यंदा वर्षभरात ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Horticulture Plantation | Agrowon

फळबाग लागवड उद्दिष्ट

गेल्या वर्षी उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या १८ जिल्ह्यांसह उद्दिष्टाच्या सर्वाधिक २२३ टक्के लागवड पूर्ण करणाऱ्या गोंदिया जिल्ह्याचे विशेष कौतुक केले आहे.

Horticulture Plantation | Agrowon

फळबाग लागवड प्राधान्य

राज्यात गेल्या काही वर्षांपासून फळबाग लागवडीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे.

Horticulture Plantation | Agrowon

मनरेगातून फळबाग लागवड

पाच हेक्टरच्या आतील व जॉब कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी मनरेगातून फळबाग लागवड केली जात आहे.

Horticulture Plantation | Agrowon

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

मात्र, पाच हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठीची स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना कोरोनाच्या काळात बंद होती. ती योजनाही गेल्या वर्षीपासून सुरू झाली आहे.

Horticulture Plantation | Agrowon

फळबाग लागवडीला वेग

त्यामुळे राज्यात फळबाग लागवडीला वेग येताना दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात प्रतिवर्षी साठ हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते.

Horticulture Plantation | Agrowon

फळबाग लागवड नियोजन

गेल्यावर्षी फळबाग लागवडीचा नवीन मापदंड वेळेत निश्चित न झाल्यामुळे पुरेशी लागवड होऊ शकली नाही. यंदा मात्र पावसाळ्या आधीच राज्यातील कृषी विभागाकडून नियोजन सुरू आहे.

Horticulture Plantation | Agrowon
Pungnur Cow | Agrowon