Nashik DCC Bank : जिल्हा बँकेने सर्वसमावेशक ‘ॲक्शन प्लॅन’ करावा

NABARD : अनेक वर्षांपासून अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा बँकेबाबत मंत्रालयात सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या दालनात बैठक झाली.
Nashik DCC Bank
Nashik DCC BankAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्हा सहकारी बँकेला ‘नाबार्ड’ने बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत सूचित करण्याबाबत अंतिम नोटीस दिली. त्यामुळे बँकेची भांडवल पर्याप्तता वाढविणे गरजेचे आहे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

त्याचवेळी बँकिंग परवाना रद्द करण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी जिल्हा बँकेने सर्वंकष ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा. राज्य सरकारने भागभांडवलाबाबत हमी देऊन हा प्रस्ताव ‘नाबार्ड’ला सादर करावा, असे आदेश वळसे-पाटील यांनी दिले.

अनेक वर्षांपासून अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा बँकेबाबत मंत्रालयात सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या दालनात बैठक झाली. या वेळी भुजबळ यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, विभागीय सहनिबंधक संतोष पाटील, ‘नाबार्ड’च्या महाप्रबंधक रश्मी दरक, नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक प्रतापराव चव्हाण उपस्थित होते.

जिल्हा सहकारी बँकेवर किमान पुढील पाच वर्षे प्रशासकाची नेमणूक कायम ठेवण्यात यावी, कर्जदारांना ‘ओटीएस’ करता यावे, यासाठी प्रयत्न झाल्यास ते योग्य होतील. अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेला वाचवायचे असल्यास सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे मोठ्या कर्जदारांकडून सक्तीने कर्जवसुली करण्यासाठी बँकेने कृती आराखडा तयार करावा.

Nashik DCC Bank
Nashik DCC Bank : शेतकरी म्हणतात सरकार कुठं आमच्या पाठीशी?

मूळातच नाशिक जिल्हा सहकारी बँक ही देशातली नावाजलेली बँक होती. बँकेचे आजही ११ लाख एवढे वैयक्तिक ठेवीदार आहेत. त्याचप्रमाणे एक हजारापेक्षा अधिक संस्थात्मक ठेवी आहेत. बँकेचा पत आराखड्यात दुसरा क्रमांक असायचा. मधल्या काही काळात बँकेची आर्थिक परिस्थिती बिघडली. सद्यःस्थितीत ही बँक ९०९ कोटी एवढ्या मोठ्या तोट्यात आहे, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

Nashik DCC Bank
Nashik DCC Bank : ‘जिल्हा बँकेची वसुली थांबवा, शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करा’

बँक उभी राहण्यासाठी प्रयत्न

जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. या बँकेला वाचविणे गरजेचे आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जवळपास ६८ वर्षाची परंपरा असून ही बँक महाराष्ट्रातील नावाजलेल्या बँकामध्ये गणली जाते.

जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणात जिह्यातील सहकारी संस्थाची मातृसंस्था म्हणून बँकेने कामकाज केलेले आहे. जिल्ह्याच्या विकासात या बँकेची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. बँक उभी राहण्यासाठी सर्व स्तरावर आपले प्रयत्न सुरू आहेत, असे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com