Nanded Rain : नांदेडला सरासरीच्या १३० टक्के पाऊस

सलग चौथ्या वर्षी तुफान पाऊस : धर्माबादला सर्वाधीक १७८ टक्के नोंद
Nanded Rain
Nanded RainAgrowon

कृष्णा जोमेगावकर : ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : नांदेड जिल्ह्यात सलग चार वर्षापासून पावसाने सरासरी (Rain) ओलाढंली आहे. यंदाही तुफान पाऊस होऊन वार्षिक सरासरीच्या १५६.८० मिलिमीटरनुसार १२९.७९ टक्के पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस धर्माबाद तालुक्यात सरासरीच्या १७८.१७ टक्के झाला.
 

Nanded Rain
Cotton Rate : कापसाचे दर दबावात

मराठवाड्यात नांदेड जिल्हा हमखास पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ८९१.३० मिलिमीटर पावसाची नोंद होते. यात सर्वाधिक पाऊस जंगल भाग असलेल्या माहूर तालुक्यात १०१६ मिलिमीटर व किनवट तालुक्यात १०२६ मिलिमीटर पडतो. मागील वर्षी जिल्ह्यात १२३० मिलिमीटरनुसार १३८.०३ टक्के पर्जन्यमान झाले होते.

Nanded Rain
Soybean Rate : सोयाबीन दराची स्थिती काय?

दरम्यान, यंदाही भारतीय हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. यानुसार जून महिना सुरू होताच पावसाचे आगमन झाले. परंतु जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने तुफान सुरुवात केली. हा पाऊस जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत शंभर टक्क्यांच्या वर झाला. जिल्ह्यात

जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात सरासरी ८९१.३० मिलिमीटर पाऊस होतो. परंतु यंदा सरासरी ११५६.८० मिलिमीटरनुसार तब्बल १२९.७९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सर्वाधीक धर्माबाद तालुक्यात १४३६.८० मिलीमीटनुसार १७८.१७ टक्के झाला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com