Anil Jadhao
आंतरराष्ट्रीय बाजारात कापडाला मागणी कमी आहे. त्यामुळे देशातून कापड निर्यात कमी झाली. त्यामुळं कापड उद्योग अडचणीत आल्याचं कापड गिरण्यांकडून सांगण्यात येत आहे.
कापड निर्मितीसाठी लागणाऱ्या काही कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत आहे. तर बऱ्याच गिरण्यांना कामगारांचाही तुटवडा जाणवतोय. त्यातच कापडाला मागणी नाही.
केवळ २७ टक्केच कापड गिरण्या ९५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने सुरु आहेत. तर २३ टक्के गिरण्या ५० टक्क्यांपेक्षा कमी क्षमतेने उत्पादन करत आहेत.
केवळ १९ टक्के गिरण्याच ५० ते ७० टक्के क्षेमतेचा वापर करत आहेत. तर ७० ते ८४ टक्के क्षमता वापरणाऱ्या गिरण्या केवळ २३ टक्के असल्याचं जाणकारांनी सांगितलं.
कापडाला उठाव कमी असल्याने अनेक गिरण्यांकडे १ ते २ महिन्यांचा साठा पडून आहे. तर काही कापड गिरण्यांकडील तयार कपड्यांचा साठा २ महिन्यांपेक्षा जास्त काळापासून तसाच आहे.
सध्या राज्यात कापसाला ७ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय. सध्या कापूस दबावात असला तरी फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.