Soybean Rate : सोयाबीन दराची स्थिती काय?

केंद्र सरकारने सोयाबीन आणि सोयातेलावरी स्टाॅक लिमिट काढले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात आज पुन्हा काहीशी वाढ झाली होती. याचा देशातील बाजारावर परिणाम दिसत आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

केंद्र सरकारने सोयाबीन (Soybean) आणि सोयातेलावरी स्टाॅक लिमिट (Stock Limit) काढले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल (Soyaoil) आणि सोयापेंडच्या (Soyacake) दरात आज पुन्हा काहीशी वाढ झाली होती. याचा देशातील बाजारावर परिणाम दिसत आहे. मग देशात सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) किती वाढ झाली? पुढील काळात सोयाबीनचा बाजार कसा राहू शकतो? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

Soybean Rate
Soybean Rate : केंद्राने सोयाबीनवरील स्टाॅक लिमिट काढले | Agrowon

कापसाला मागणीची प्रतिक्षा

राज्यातील बाजारात कापासाचे दर सध्या काहीसे दबावातच आहेत. तर दुसरीकडे आवक वाढतच आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस नाही. त्यामुळे कापसातील ओलावा कमी झाला. पण सूत आणि कपड्यांना उठाव कमी असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं कापसाचे दरही दबावात आहेत. सध्या राज्यात कापसाला ७ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय. सध्या कापूस दबावात असला तरी फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. 

मका दर नरमले

राज्यातील काही बाजारांमध्ये मक्याची आवक सुरु झाली. सध्या नव्या मक्यामध्ये ओलावाही जास्त येतोय. त्यामुळं मक्याचे दर काहीसे नरमले आहेत. सध्या राज्यातील बाजारात मक्याला किमान १ हजार ६०० रुपयांपासून दर मिळतोय. तर कमाल दर २ हजार १०० रुपयांवर पोचलाय. सरासरी दर २ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र दुसरीकडे मक्याला उठावही मिळतोय. त्यामुळं मक्याला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार रुपये दर मिळू  शकतो, अशी माहिती मका बाजारातील अभ्यासकांनी दिली. 

Soybean Rate
Soybean Rate : नांदेडला सोयाबीन सरासरी ४८५० रुपये क्विंटल

हरभऱ्याचा दर कमीच

देशात सध्या हरभरा पेरणी सुरु झाली. मात्र दुसरीकडे बाजारात हरभरा दर अद्यापही दबावातच आहेत. दिवाळीत हरभऱ्याला अपेक्षेप्रमाणं उठाव मिळाला नाही. त्यामुळं हरभरा बाजार आणखी दबावात आलाय. सध्या देशात हरभऱ्याला सरासरी ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपये दर मिळतोय. देशात सध्या हरभऱ्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे दरात मोठ्या तेजीची अपेक्षा नाही, असा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय. 

संत्रा बाजार दबावातच

राज्यातील बाजारात सध्या संत्रा आवक सुरु झाली. मात्र ऑक्टोबर महिन्यात सतत झालेल्या पावसानं संत्र्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. पावसाचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळं संत्र्याला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी मिळालं. परिणामी संत्र्याची गोडी कमी झाली. याचा फटका सध्या बाजारात बसतोय. गोडी कमी असल्यानं व्यापारी संत्र्याची कमी दरात खरेदी करत आहेत. सध्या संत्र्याला सरासरी केवळ ४ हजार ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. पुढील काळात संत्र्याचे दर वाढू शकतात, असा अंदाज संत्रा व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. 

Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीनला काय दर मिळतोय ?

5. केंद्र सरकारने मंगळवारी सोयाबीन आणि सोयातेलावरील स्टाॅक लिमिट काढल्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर जाणवला होता. तसचं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडचे दर वाढले आहेत. त्यामुळे देशातील सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळाली. काल अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचे दर क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढले होते. देशातील मध्य प्रदेशातील इंदोर, उज्जैन आणि अशोक नगर बाजारांमध्ये तर राजस्थानमधील कोटा आणि बाराण तसंच  लातूर, अकोला आणि नागपूर बाजारांमध्ये सोयाबीनच्या कमाल दराने ५ हजार २०० रुपयांचा टप्पा गाठला होता. आज मात्र सोयाबीन दर काही बाजारांमध्ये काहीसे नरमले होते. दरात आज क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंत नरमाई दिसून आली. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील बाजारांमध्ये सोयाबीनचे दर सरासरी ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान पोचले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे दर काहीसे नरमले होते. सोयाबीनचे दर १४.५४ डाॅलर प्रतिबुशेल्सवरून आज १४.३९ डाॅलरवर पोचले होते. तर दुसरीकडे देशातील सोयाबीनमध्ये सध्या ओलावा कमी येतोय. सकाळी थंडी जाणवत असली तरी दुपारी ऊन पडत असल्याने सोयाबीन वाळवता येत आहे. ओलावा कमी असल्याने सोयाबीनचे दर काहीसे सुधारले आहेत. यंदा शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com