
मुरूडच्या शेतकऱ्यांना आंबोली कालव्याची प्रतीक्षा सात वर्षांपासून काम रखडले; शेकडो हेक्टरवर दुबार पीक घेण्यात अडचणी
मुरूड ः तालुक्यातील खार आंबोली धरणाचे (Amboli Dam) पाणी शेतीपर्यंत पोचू न शकल्याने अनेक वर्षांपासून भातशेतीव्यतिरिक्त (Paddy Farming) अन्य पिके घेण्यास शेतकरी धजावत आहेत. २०१४ मध्ये राज्यभर जलयुक्त शिवार योजनेची (Jalyukta Shivar Yojna) अंमलबजावणी करण्यात आली,
परंतु आंबोली धरणावर अवलंबून उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम सात वर्षांपासून बंद पडल्याने हजारो शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळालेच नाही. पारंपरिक शेतीबरोबरच अत्याधुनिक तंत्राच्या मदतीने विविध पिके घेण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते.
त्यासाठी अनुदान, प्रशिक्षण, मार्गदर्शन कार्यशाळांचेही आयोजन केले जाते. शेती उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावा, या त्यामागचा हेतू आहे. मात्र गेल्या सात वर्षांपासून आंबोली धरणातील कालव्याचे काम रखडल्याने मुरूड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरले आहे.
कालव्याचे पाणी मिळाल्यास तालुक्यातील तब्बल ६०० हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याची शक्यता आहे. आंबोली धरणाचे लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या, डाव्या तीर कालव्याचे काम जून २०१५ पासून बंद आहे. धरणाची पाणी साठवणूक क्षमता मोठी आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास बागायती, दूग्ध व्यवसाय व कृषी पर्यटनाला चालना मिळेल, शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची संधी मिळेल आणि तालुक्याचा सरासरी आर्थिकस्तर उंचावेल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
मुरूडसह १२ गावांना पाणी
आंबोली धरण २००९ बांधण्यात आले असून त्यासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च करण्यात आला. स्थानिक शेतकऱ्यांना दुबार पीक घेता यावे, त्याचबरोबरच तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटावी, या उद्देशाने धरण बांधण्यात आले. मुरूडसह लगतच्या १२ गावांना धरणातून पाणी पुरवठा होतो.धरणाचे काम
आंबोली धरण उजव्या तीर कालव्याचे काम १० किमी प्रस्तावित आहे. सद्यःस्थितीत ६.१ किमी काम अपूर्ण आहे. तर डाव्या तीर कालव्याचे २.६४ किमी प्रस्तावित असून १.६४ किमी काम सात वर्षांपासून रखडले आहे.
कालव्याच्या कामास सुधारित मान्यता, त्यानंतर कार्यादेश मिळेपर्यंत दोन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रकल्प १२३ कोटींचा असून भूसंपादनाचे १०० कोटींहून अधिक रकमेचे वाटप झाले आहे.
- एस.डी. जाधव, कार्यकारी अभियंता, पेण
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.