Soybean Disease : सोयाबीनवर ‘मोझॅक’चा प्रादुर्भाव

सोयाबीनचे आगार म्हटल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकावर येलो मोझॅक व सोयाबीन ग्रीन मोझॅक या रोगांचा प्रादुर्भाव काही भागात आढळून आला आहे.
Soybean
Soybean Agrowon

वाशीम ः सोयाबीनचे आगार म्हटल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यात यंदा सोयाबीन (Soybean) पिकावर येलो मोझॅक (Yelow Mosaic Outbreak On Soybean) व सोयाबीन ग्रीन मोझॅक या रोगांचा प्रादुर्भाव काही भागात आढळून आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी याबाबत पाहणी करून शिक्कामोर्तब केले. शिवाय यावर उपाययोजनाही शेतकऱ्यांना सुचविल्या आहेत.

Soybean
Soybean Rate : वाशीममध्ये नवीन सोयाबीन ५७०० रुपये प्रतिक्विंटल

जिल्ह्यात मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर कृषी विभागाने शास्त्रज्ञांना पाचारण केले होते. कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. प्रकाश घाटोळ, मृद व कृषी रसायनशास्त्रज्ञ डॉ. अशोक आगे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. सुनील भलकारे, वनस्पती शरीररचना विभागप्रमुख डॉ. ताराचंद राठोड यांनी वाशीम तालुक्यातील टो गावातील सुभाष काकडे, माधव काकडे, बबन लगड व केकतउमरा येथील ज्ञानबा तडस या शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन पिकाची पाहणी केली.

Soybean
Soybean Rate : दर पाडण्यासाठीच वायदे बंदीला ‘सोपा’चे समर्थन

प्रक्षेत्र भेटीदरम्यान या शास्त्रज्ञांनी सोयाबीनवर पिवळ्या मोझॅकबाबत दिसून येणारी लक्षणे आढळून आली आहे. सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट पिवळे ठिपके/चट्टे दिसले. कालांतराने ठिपक्यांच्या /चट्ट्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा ऱ्हास होतो व फक्त शिरा हिरव्या राहतात आणि इतर भाग पिवळा पडत असल्याचे दिसले.

सध्या नुकसान पातळीच्या खाली सोयाबीन मोझॅक विषाणूने प्रभावित झाडे आढळून आलेली आहेत. सध्या करावयाच्या उपाययोजनांमध्ये पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे समूळ उपटून खड्ड्यात पुरावीत किंवा नष्ट करावीत. पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होत असल्याने या किडीच्या व्यवस्थापनासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा शिफारसीनुसार वापर करावा. हेक्टरी १० ते १५ पिवळे चिकट सापळे लावावेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com