Soybean Rate
Soybean RateAgrowon

Soybean Rate : वाशीममध्ये नवीन सोयाबीन ५७०० रुपये प्रतिक्विंटल

लोणार तालुक्यातील बीबी येथील शेतकरी विशाल केंदळे यांनी यंदा लागवड केलेल्या सोयाबीनची काढणी केली. हा माल त्यांनी विक्रीसाठी आणला असता वाशीम बाजार समितीत सोयाबीनच्या खरेदीचा मुहूर्त साधण्यात आला.
Published on

वाशीम ः या हंगामातील लागवड असलेले सोयाबीन (Soybean Sowing) काही ठिकाणी काढणीसाठी (Soybean Harvesting) तयार होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात सोयाबीनची काढणी करून विशाल केंदळे या शेतकऱ्याने ३५ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी (Soybean For Sale) आणले असता त्या मालाला ५७०१ रुपये प्रतिक्विंटलचा दर (Soybean Rate) मिळाला. हंगामातील नवीन सोयाबीनला हा पहिलाच दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.

Soybean Rate
Soybean Rate : दर पाडण्यासाठीच वायदे बंदीला ‘सोपा’चे समर्थन

लोणार तालुक्यातील बीबी येथील शेतकरी विशाल केंदळे यांनी यंदा लागवड केलेल्या सोयाबीनची काढणी केली. हा माल त्यांनी विक्रीसाठी आणला असता वाशीम बाजार समितीत सोयाबीनच्या खरेदीचा मुहूर्त साधण्यात आला. विशाल केंदळे यांचा बाजार समितीचे सचिव भगवानराव इंगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

बाजार समितीचे प्रशासक महेश कच्छवे, समितीचे निरीक्षक वामन सोळंके, लेखापाल प्रवीण लांडकर, पर्यवेक्षक उ. रा. महाले, ज. सो. बुधे, निरीक्षक रा. वि. वानखेडे, लिपिक यो. ल. बुंधे, उ. द. मापारी, रा. ग. चव्हाण, मा. ह. गोटे, ह. चि. खंडारे, मो. मो. भालेराव, गं. बु. उदिवाले, बा. म. इंगोले, तसेच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश भोयर, व्यापारी दिलीप लाहोटी, अडते बबला देवाणी, गोविंदराव ठाकरे, तुळशीराम सावके, अमित बियाणी यांच्यासह इतर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com