Monsoon Update : या भागातून परतला माॅन्सून !

राज्यात पावसाचो जोर काहीसा कमी झालाय. मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडतोय. तर माॅन्सूनने देशातील आणखी काही भागांमधून काढता पाय घेतला.
Monsoon Update`
Monsoon Update`Agrowon
Published on: 
Updated on: 

पुणेः राज्यात पावसाचो जोर (Rain Intensity) काहीसा कमी झालाय. मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस (Rainfall) पडतोय. तर माॅन्सूनने (Monsoon Update) देशातील आणखी काही भागांमधून काढता पाय घेतला. उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning) हवामान विभागानं (Weather Department) वर्तविली.

Monsoon Update`
Monsoon Update : ईशान्य मॉन्सूनला सुरुवात

माॅन्सूनने आज देशाच्या काही भागांतून काढता पाय घेतला. माॅन्सूनने आज उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा बहुतांशी भाग, पश्चिम मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तराखंड सौराष्ट्र आणि कच्छ, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागातून माॅन्सून परतला आहे. या भागांमध्ये परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे.

Monsoon Update`
Monsoon Update : शेतकऱ्यांनो, बनावट हवामान तज्ज्ञापासून सावधान !

कोकणात आज पावसाचा जोर आज कमी होता. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या सरी पडल्या. रायगड जिल्ह्यातील मानगाव मंडळात ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर वाकवली मंडळात हलक्या सरी पडल्या. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि मुलदे येथे पावसाचा शिडकावा झाला. कोकणात मागील काही दिवासांपासून पाऊस कमी झालाय.

मध्य महाराष्ट्रातही काही मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे सर्वाधिक ६० मिलिमीटर पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील दौंड आणि लोणावळा येथेही हलक्या पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि सांगली जिल्ह्यातील कसबेडिग्रस आणि कडेगाव या मंडळांमध्येही पाऊस झाला.

तसचं जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसानं उघडीप दिली. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या मात्र पावसाचा जोर कमीच होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com