
येवला, जि. नाशिक : कृषी विभागाचा अधिकारी (Bogus Agriculture Officer) आहे, असे भासवून तालुक्यातील कृषिनिविष्ठा विक्री केंद्रचालकांकडे (Agriculture Input Center) दुकाने तपासणीच्या नावाखाली पैशांची मागणी (Extortion) करणाऱ्या तोतया अधिकऱ्याला (Bogus Officer Arrested) तालुका पोलिसांनी अटक केली. हा संशयित बाळापूर येथील आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारी होत होत्या. नगरसूलच्या योगेश्वर कृषी सेवा केंद्राचे संचालक संजय गाडे यांनी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
संजय गाडे यांना ८ ऑगस्टला बाळापूर येथील बबन लक्ष्मण शिरसाट (रा. धनकवडी रस्ता, बाळापूर) याने मोबाइलवरून आपण कृषी विभागाचे अधिकारी रमेश शिंदे बोलत असून, आपण आपल्या केंद्रात खते ठेवता का, परवाना आहे का, स्टॉकच्या नोंदी आपण ठेवता का, अशी विचारणा केली. त्यानुसार गाडे यांनी उत्तरे दिली. त्यावर तोतयाने तुमच्या कृषी सेवा केंद्राची तपासणी केली, तर तुम्ही गोत्यात याल, तुमचा परवाना रद्द होईल, माल जप्त होईल, असा दम दिला.
तसे होऊ द्यायचे नसेल तर तीन हजार रुपये पाठवा, अशी मागणी गाडे यांच्याकडे केली. तोतया अधिकाऱ्याने गाडे यांना फोन पे नंबर देऊन त्यावर पैसे पाठवायला सांगितले. गाडे यांनी पैसे पाठविल्यानंतर काही दिवसांनंतर विविध कृषी सेवा केंद्रचालक प्रभाकर जनार्दन ठाकूर (ठाकूर कृषी सेवा केंद्र, खैरगव्हाण), गोरख राजाराम कोल्हे (रा. हडपसावरगाव, अथर्व कृषी सेवा केंद्र, नगरसूल), अशोक रामदास पवार (सर्वज्ञ कृषी सेवा केंद्र, नगरसूल) यांनादेखील या तोतया अधिकाऱ्याने कृषी अधिकारी शिंदे यांचे नाव सांगत फोन करून पैशांची मागणी केली.
संजय गाडे यांच्यासह संबंधितांनी जिल्हा परिषदेतील कृषी विभागाला या घटनेबाबत माहिती दिली असता, तेथे रमेश शिंदे हे कृषी विकास अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे समजले. तथापि त्यांनी कोणालाही फोन केलेला नसल्याचे शिंदे या अधिकाऱ्याने सांगितले. विभागीय कृषी संचालक मोहन वाघ व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्या सूचनेनुसार कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे व मोहीम अधिकारी अभिजित जमधडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागील महिन्यात नांदगाव तालुक्यात घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली होती. त्यामुळे टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दोन मोबाइल, ६ सीमकार्ड्स जप्त
कृषिनिविष्ठा विक्रेते यांनी संजय गाडे यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना तोतया अधिकारी बबन शिरसाट याच्याकडून दोन मोबाइल फोन, इतर वेगवेगळी ६ सीमकार्ड्स व एक आधार कार्ड, ई-श्रमकार्ड मिळून आले. सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे तपास करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.