Heavy Rain : निफाड तालुक्याच्या उत्तर भागात अतिवृष्टीसदृश पाऊस

सिन्नर तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतांची मोठी दैना झाली आहे. मंगळवारी (ता. ६) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास निफाड तालुक्यातील सावरगाव परिसरात तासभर झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. ओढे-नाले भरल्याने पूरसदृश स्थिती झाली.
Heavy Rain
Heavy Rain Agrowon
Published on
Updated on

नाशिक : सिन्नर तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे (Rain Like Cloudburst) शेतांची मोठी दैना (Agriculture Damage) झाली आहे. मंगळवारी (ता. ६) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास निफाड तालुक्यातील सावरगाव परिसरात तासभर झालेल्या पावसामुळे (Rainfall Nashik) सर्वत्र पाणीच पाणी झाले. ओढे-नाले भरल्याने पूरसदृश (Flooding) स्थिती झाली.

Heavy Rain
Rain Update : मुसळधार पावसाने दाणादाण

उन्हाचा चटका असतानाच सावरगाव परिसरातील केद्राई तसेच खडकओझर रस्त्यावर पावसाने दाणादाण उडवली. नाले भरून वाहिले आणि पाणी शेतांमध्ये शिरल्याने टोमॅटो, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील कऱ्हा नदीला आलेल्या पुरामुळे पुलाचे नुकसान झाले.

केद्राई तसेच खडक ओझर रस्त्यावर पावसाने दाणादाण उडवली. पावसाचे पाणी शिवारात घुसल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते. मुसळधार पावसामुळे सावरगाव ते केंद्रे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. पाण्याचा प्रवाह शिवारात शिरल्याने काही शेतातील माती वाहून गेली, अशी माहिती शेतकरी विजय कुशारे यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शहा, वावी व देवपूर महसूल मंडलांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिंडोरीतील ननाशी परिसरात जोरदार पाऊस होता. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत हलका पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com