Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप

Pune Monsoon Update : जिल्ह्यातील चित्र ः पूर्व भागात पेरण्या थंडावल्या
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृ्त्तसेवा
Pune Weather News: पुणे : गेल्या आठवडाभर पावसाने पश्‍चिम पट्ट्यात दमदार हजेरी लावली. त्यानंतर आता पावसाचा जोर (Rain) काहीसा जोसरला आहे. मंगळवारपासून (ता. ४) जवळपास सर्वच भागांत पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे.

बुधवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये वेल्हा येथे ४०.३ मिलिमीटर पाऊस पडला. तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत असल्या, तरी पूर्व भागात अजूनही पेरण्या थंडावल्या आहेत.

जोरदार पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

गेले दहा ते बार दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता.

तर लोणावळा, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, मुळशी आणि कुंडली या घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस पडला. त्यामुळे धरणांत नव्याने १२.३९ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

पावसामुळे भातपट्ट्यात लागवडी सुरू झाल्या असून, ज्या ठिकाणी धूळपेरणीवर भात लागवडी केल्या होत्या. त्या ठिकाणी भात रोपे उगवून आली आहेत.

Rain
Sangli Rain Update : सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पूर्व भागातील तालुक्यात अधूनमधून ऊन पडत असल्याची स्थिती आहे. हवेलीतील पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, खेड, भोसरी, चिंचवड भागांत पावसाचा शिडकावा झाला असून, खडकवासला, थेऊर, उरुळीकांचन, कळस, हडपसर, वाघोली भागांत पावसाची उघडीप दिली. मुळशीतील पौड, घोटावडे, माले, मुठे, पिरंगुट भागांत तुरळक सरी पडल्या असून, थेरगाव भागात ढगाळ वातावरण होते.

भोरमधील किकवी, वेळू, निगुडघर येथे हलक्या सरी पडल्या असून, भोर, भोलावडे, नसरापूर, आंबवडे, संगमनेर भागात पावसाने दडी मारली. मावळमधील वडगाव मावळ, तळेगाव, काले, कार्ला, खडकाळा, लोणावळा भागांत तुरळक सरी पडल्या. वेल्ह्यातील पानशेत, विंझर, आंबवणे, जुन्नरमधील नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूर या सर्व भागांत ढगाळ वातावरण होते.

खेडमधील वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, पिंपळगाव, कडूस येथे तुरळक सरी पडल्या असून, आळंदी, कन्हेरसर येथे ढगाळ वातावरण होते. आंबेगावमधील
आंबेगाव पाच मिलिमीटर, तर कळंब, पारगाव, मंचर, घोडेगाव अधूनमधून पाऊस पडत होता. शिरूरमधील टाकळी, वडगाव, न्हावरा, रांजणगाव, कोरेगाव भागांत हलक्या
सरी, तर पाबळ, शिरूर, मलठण, तळेगावला ढगाळ वातावरण होते.

Rain
Rain Update : पावसाची उघडीप कायम राहणार?

बारामतीतील माळेगाव, लोणी, सुपा, मोरगाव येथे तुरळक, तर उंडवडी, पणदरे, वडगाव येथे
ढगाळ वातावरण होते. इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णी, सणसर येथे हलक्या सरी, तर दौंडमधील पाटस, केडगाव वगळता देऊळगाव, यवत, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड भागांत ढगाळ वातावरण होते. पुरंदरमधील वाल्हा येथे २.३ मिलिमीटर पाऊस पडला असून, सासवड, भिवंडी, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी भागांत ढगाळ वातावरणासह अधूनमधून ऊन पडत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com