MLA Disqualification : आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी लांबणीवर

Maharashtra Political Crisis : शिवसेनेत (ठाकरे) बंडखोरी केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांवर अपात्रतेची कारवाईबाबत कोर्टकचेरी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय अध्यक्षाकडे सोपविला.
Udhhav Thackeray Eknath Shinde
Udhhav Thackeray Eknath ShindeAgrowon

Mumbai News : ‘‘शिवसेनेतील फुटीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पाच महिन्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर अपात्रतेसंदर्भातील पहिली सुनावणी गुरुवारी (ता. १४) झाली.

मात्र, पुरेशा कागदपत्रांभावी सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. नार्वेकर यांनी दोन्ही गटांना कागदपत्रे आदानप्रदान करण्यास दोन आठवड्यांची मुदत दिली. त्यामुळे सुनावणीच्या पहिल्या दिवशी कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली. आता दोन आठवड्यांनंतर सुनावणीसंदर्भात निर्णय होणार आहे.

शिवसेनेत (ठाकरे) बंडखोरी केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांवर अपात्रतेची कारवाईबाबत कोर्टकचेरी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय अध्यक्षाकडे सोपविला. तब्बल दोन महिन्यानंतर नार्वेकर यांनी १४ सप्टेंबरला सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले.

Udhhav Thackeray Eknath Shinde
Agriculture Department : वीस उपसंचालकांना ‘एसएओ’पदी बढती

त्यानुसार विधिमंडळात गुरुवारी दुपारी १२ वाजता शिवसेनेतील आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरवात झाली. शिवसेनेकडून (ठाकरे) असीम सरोदे आणि शिंदे गटाकडून अनिल सिंग या वकिलांनी एकमेकांविरोधात जोरदार युक्तिवाद केला. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दोघांनाही विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले.

Udhhav Thackeray Eknath Shinde
G20 Summit Agriculture Product : G20 नेत्यांना भेट दिलेली टॉप ५ कृषी उत्पादने जाणून घ्या

शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी या प्रकरणातील सर्व याचिकांवर विधानसभा अध्यक्षांनी एकाच वेळी सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली. तसे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले असून त्यांनी प्रतिवाद्यांना कागदपत्रे द्यायला हवीत, असे ते म्हणाले. शिंदे गटाच्या वकिलांनी त्यावर आक्षेप नोंदवत ‘प्रभू यांच्याकडील कागदपत्रे आम्हाला मिळाली नाहीत.

अशातच सणवार तोंडावर असल्याने कागदपत्रे सादर करण्यास दोन आठवड्याची मुदत मिळावी,’ अशी विनंती केली. नार्वेकर यांनी त्यानुसार दोन्ही बाजूच्या आमदारांना कागदपत्रे एकमेकांकडे देणे आणि दोन्ही गटांकडून लिखित उत्तर घेण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला. तसेच लवकरच पुढील तारीख जाहीर करू, असे स्पष्ट केले.

अध्यक्षांकडून वेळकाढूपणा : वायकर

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे प्रतोद आणि गटनेते पद अवैध ठरवले आहे. तसेच तीन महिन्यांत या घटनेचा निकाल देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. परंतु, अध्यक्षांकडून कार्यवाही ऐवजी वेळकाढूपणा केला जात आहे, असा आरोप शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी केला. ‘‘विधानसभा अध्यक्ष निवडीतील मतदान प्रक्रियेच्या नोंदी आणि व्हिडिओ रेकॉर्ड तपासले तरी कारवाई करण्यास सहज सोपे होईल,’’ असे ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com