sandeep Shirguppe
मागच्या काही दिवसांपूर्वी जगभरातील २० देशांनी भारतात G20 परिषदेला हजेरी लावली. यावेळी विविध विषयांवर चर्चाही झाली.
दरम्यान G20 परिषदेत आलेल्या प्रमुखांना कृषी उत्पादनांच्या भेटवस्तू देण्यात आल्या, यातून भारतात कृषी उत्पादनांना महत्व देण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि व्यापार संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी उत्पादने देण्यात आले.
G20 परिषदेवेळी पाहुण्यांना काश्मिरमधील क्रोकस सॅटिव्हसच्या फुलापासून तयार होणारी केसर भेट देण्यात आली.
दार्जिलिंग आणि निलगिरी चहा या अनुक्रमे हिमालयीन प्रदेशात आणि निलगिरीच्या टेकड्यांवर उगवल्या जाणार्या प्रसिद्ध भारतीय जाती आहेत, जे भारताच्या कृषी उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या गोष्टी भेट देण्यात आल्या.
अराकू कॉफी ही एक प्रिमियम भारतीय कॉफी आहे जी तिच्या दर्जेदार आणि अनोख्या चवींसाठी ओळखली जाते.
निसर्गरम्य अराकू व्हॅलीमध्ये याची लागवड केली जाते, स्थानिक शेती आणि शाश्वत कॉफी उत्पादनास समर्थन देते.
सुंदरबनच्या खारफुटीच्या जंगलात मिळणारे मध अद्वितीय कृषी उत्पादन आहे, यामध्ये अत्यंत सूंदर फुलांपासून मध तयार होते याचे चांगले आरोग्यदायी फायदे असल्याने याचीही निवड करण्यात आली होती.
मध्य पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये वापरल्या जाणाऱ्या झिघराणा परफ्यूम तेलही नेत्यांना भेट देण्यात आले. हे तेल नैसर्गिक घटकांपासून बनविलेले आहे आणि त्याच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि मोहक सुगंधांसाठी ओळखले जाते.