Sugarcane FRP : ऊस दरासाठी आमदार खोत यांची पायी दिंडी

इतर जिल्ह्यातील कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या उसाला ३१०० च्या पुढे दर दिला. परंतु सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांची २८००-२९०० रुपयावर बोळवण केल्याचे ते म्हणाले.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon

कऱ्हाड, जि. सातारा ः ‘‘महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantraon Chavan) यांनी सहकार चळवळ (Cooperative Movement) उभी केली. परंतु आज त्यांचे चेले त्यांचा विचार विसरले आहेत. फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी त्यांचे नाव घेत आहेत. चव्हाण साहेब या कारखानदारांना उसाला ३५०० रुपये दर (Sugarcane Rate) देण्याची सुबुद्धी द्या,’’ असे साकडे शेतकऱ्यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी घातले.

इतर जिल्ह्यातील कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या उसाला ३१०० च्या पुढे दर दिला. परंतु सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांची २८००-२९०० रुपयावर बोळवण केल्याचे ते म्हणाले.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : सोलापूर जिल्ह्यातील ऊसदर कोंडी अखेर फुटली

कोपर्डे हवेली ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या पायी दिंडीच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे, शेतकरी सुदाम चव्हाण, भरत चव्हाण, राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : किसन वीर कारखान्याची एफआरपीची रक्कम वर्ग

श्री. खोत म्हणाले, ‘‘कारखान्यातील स्पर्धा वाढली तरच उसाला चांगला भाव मिळेल. यासाठी दोन कारखान्यांतील २५ किलोमीटरचे अंतराची अट शिथिल केली पाहिजे. सर्व पक्षातील कारखानदारांची युती आहे. त्यांनी शेतकऱ्यांना लुटण्याचे ठरवले आहे. त्यांचा स्वहाकार हाच पक्ष आहे. इतर व्यवसायाला कसलीही बंधने नाहीत, कोणीही कुठेही कोणताही व्यवसाय सुरू करू शकतो. परंतु साखर कारखान्यांनाच २५ किलोमीटर अंतराचे बंधन घातले आहे.’’

श्री. पंजाबराव पाटील म्हणाले, ‘‘कारखानदारांचा शेतकरी गुलाम झाला आहे. साखरेला दर चांगला मिळतो आहे. शिवाय उसापासून इतर उपपदार्थ तयार होतात त्यामुळे कारखानदारांना चांगला दर द्यायला परवडत आहे.’’

सचिन नलावडे म्हणाले, ‘‘ज्या यशवंतराव चव्हाण यांनी सहकार रुजवला त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे सुबत्ता आली. यशवंतराव चव्हाणांचे नाव घेऊन साखर कारखानदार राजकारण करत असतात. त्यासाठी आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी येऊन कारखानदारांना ३५०० रुपये दर देण्याची सुबुद्धी द्या,’’ अशी मागणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com