Sugarcane FRP : सोलापूर जिल्ह्यातील ऊसदर कोंडी अखेर फुटली

सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील राजेवाडी येथील श्री श्री सद्‍गुरू साखर कारखान्याने यंदाच्या हंगामातील उसाला पहिली उचल २५०० रुपये जाहीर करून, प्रत्यक्षात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरही जमा केली.
Sugar Cane
Sugar CaneAgrowon
Published on
Updated on

सोलापूर ः सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील राजेवाडी येथील श्री श्री सद्‍गुरू साखर कारखान्याने (Sugar Factory) यंदाच्या हंगामातील उसाला पहिली उचल २५०० रुपये (Sugarcane FRP) जाहीर करून, प्रत्यक्षात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरही जमा केली. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून ऊसदर (Sugarcane Rate) संघर्ष समितीकडून या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. शिवाय सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराची कोंडीही यानिमित्ताने फुटली आहे.

सद्‍गुरू कारखान्याच्या या निर्णयाचे ऊसदर संघर्ष समितीचे दीपक भोसले, माउली हळणवर, तानाजी बागल, समाधान फाटे, सचिन पाटील, माउली जवळगेकर यांनी स्वागत केले असून, या निर्णयाची माहिती मिळताच या सर्व पदाधिकाऱ्यांनी थेट राजेवाडीचा कारखाना गाठून, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना साखर भरवली.

Sugar Cane
Sugar Export : साखर कराराबरोबर पाठवणीलाही वेग

तसेच आपल्या कार्यकर्त्यांना साखर भरवून जल्लोष केला. गेल्या महिनाभरापासून उसाला पहिली उचल २५०० रुपये आणि अंतिम ऊसबिल ३१०० रुपये द्यावेत, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येत ऊसदर संघर्ष समिती स्थापली आहे.

त्या माध्यमातूनच आतापर्यंत ट्रॅक्टरचे टायर फोड, टायर जाळणे, रास्ता रोको, कारखान्याचे गेट बंद आंदोलन यांसारखी आंदोलने सुरू आहेत. प्रशासनानेही कारखानदार आणि ऊसदर संघर्ष समितीला एकत्र बोलवत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

Sugar Cane
Sugar Factories: कारखान्यांची साखर निर्यातीसाठी लगबग; एफआरपीसाठी फायदा होणार का ? | ॲग्रोवन

पण ही बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण सद्‍गुरू कारखान्याने अखेरीस २५०० रुपयांप्रमाणे पहिली उचल देण्याचा हा निर्णय घेतल्याने आता अन्य कारखान्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

सद्‍गुरू कारखान्याचे आम्ही आभार मानतो, आता जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनीही शेतकऱ्यांना अधिक ताटकळत न ठेवता, तातडीने हा दर जाहीर करावा, अन्यथा आमचे आंदोलन सुरूच राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com