Sidhheshwar Sugar
Sidhheshwar SugarAgrowon

Sidhheshwar Sugar : ‘सिद्धेश्वर’ बचाव, बोरामणी विमानतळासाठी उद्या मोर्चा

बोरामणी विमानतळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आणि ‘सिद्घेश्वर सहकारी साखर कारखाना बचाव’ यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या माध्यमातून हा मोर्चा निघणार आहे.

सोलापूर ः राज्य सरकारने बोरामणी येथे मंजूर केलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ (Boramani International Airport) लवकरात लवकर सुरू करावे, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला (Sidhheshwar Sugar Mill) कोणताही धक्का न लावता होटगी रोड विमानतळावरून तूर्त विमानसेवा एका बाजूने सुरू करावी या मागणीसाठी सोमवारी (ता. १९) सकाळी ११ वाजता सिद्धेश्वर साखर कारखान्यापासून होम मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

Sidhheshwar Sugar
Sugar Production : साखर उत्पादन घटीचा अंदाज घाईचा

बोरामणी विमानतळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आणि ‘सिद्घेश्वर सहकारी साखर कारखाना बचाव’ यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या माध्यमातून हा मोर्चा निघणार आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्यापासून मोर्चाला सुरुवात होऊन हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, आसरा, महावीर चौक, सात रस्ता, रंगभवन मार्गे तो होम मैदानावर पोहोचेल. त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत होईल.

Sidhheshwar Sugar
Sugar Export : साखर निर्यात कोटावाढीबाबत केंद्र जानेवारीत घेणार आढावा

या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, भाकपचे नेते अ‍ॅड. रामचंद्र म्हेत्रस, शेतकरी संघटनेचे नेते शिवानंद दरेकर, अख्तरताज पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, सिद्धेश्वर साखर कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार, बोरामणी विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष प्रा. राजू चव्हाण, शेतकरी सभासद अंकुश आवताडे, अमोल हिप्परगी, राष्ट्रवादीचे दिनेश शिंदे, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे आदींनी केले आहे.

कामगार, शेतकऱ्यांचे उपोषण

बोरामणी विमानतळ तत्काळ विकसित करून विमानसेवा सुरू करण्यात यावी, सिद्धेश्वर साखर कारखान्याला प्रशासनाने दिलेल्या सर्व नोटिसा मागे घ्याव्यात, या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून सिद्धेश्वर साखर कामगार युनियनतर्फे कारखाना कार्यस्थळावर आणि शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ दिवसांपासून चक्री उपोषण सुरू आहे. अद्यापही आंदोलन सुरूच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com