पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : येथे ग्रीनझोन ॲग्रोकेम प्रा.लि. यांच्या वतीने बसवंत गार्डन येथे ११ ते १५ मे दरम्यान आयोजित बसवंत कृषी पर्यटन महोत्सवात महाराष्ट्र व गुजरात राज्यांत पिकविल्या जाणाऱ्या विविध आंबा जातींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
या वेळी उत्कृष्ट आंबा उत्पादकांना १६ पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात ‘मिलांज हापूस महाराजा’ आणि ‘मिलांज केसर महाराजा’ यांचाही समावेश आहे. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना ५००१ रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच हापूस, केसर व इतर जातींच्या आंबा उत्पादकांनाही प्रथम (३००० रुपये), द्वितीय (२००० रुपये) व तृतीय (१००० रुपये) आणि उत्तेजनार्थ असे पुरस्कारांचे स्वरूप असेल.
१२ मे रोजी ‘कृषी पर्यटन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले असून, त्यात यात पर्यटन विभागाचे अधिकारी, यशस्वी कृषी पर्यटन केंद्रांचे संचालक मार्गदर्शन करतील. हा परिसंवाद विनामूल्य असून, ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या महोत्सवादरम्यान बसवंत गार्डनमधील बसवंत मधमाशी उद्यान, प्रक्रिया उद्योग, आदर्श गाव सेवरगाव तसेच बसवंत पर्यटन केंद्रातील अनेक उपक्रमांना भेट देण्याची संधी उपलब्ध केली जाईल. अशा बसवंत कृषी पर्यटन व आंबा महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी www.baswant.com या वेबसाइटला भेट द्यावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.