Maharashtra Monsoon Session 2023 : विरोधी पक्षनेत्याविना पावसाळी अधिवेशन

Maharashtra Assembly Session : अधिवेशनाचे दोन आठवडे विरोधी पक्षनेत्याविना गेल्यानंतर आता उर्वरित तीन दिवसांसाठी तरी विरोधी पक्षनेता राज्याला मिळतो का? याकडे लक्ष लागले आहे.
Vidhan Bhavan
Vidhan BhavanAgrowon
Published on
Updated on

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली की नाही याचे उत्तर अधिवेशनाचे दोन आठवडे उलटले तरीही अजूनही स्पष्ट झालेले नाही. याचे कारण आहे, काँग्रेसमधील ‘ठंडा करके खाओ’ या पद्धतीमुळे. विरोधी पक्षनेते पदाची निवड न करून शरद पवार गटाला सहकार्य तर अजित पवार यांना खिंडीत पकडण्यात काँग्रेसने एकप्रकारे सहकार्य केले आहे. अधिवेशनाचे दोन आठवडे विरोधी पक्षनेत्याविना गेल्यानंतर आता उर्वरित तीन दिवसांसाठी तरी विरोधी पक्षनेता राज्याला मिळतो का? याकडे लक्ष लागले आहे.

‘राष्ट्रवादी’चे फुटीर आमदार अधिवेशनात अनुपस्थित आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत, याची स्पष्टता सभागृहात स्पष्ट होत नाही. ‘राष्ट्रवादी’च्या प्रवेशाने बेचैन झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांची ठाकरेंविरोधातील टीकेची धार बोथट झाली असली तरी भाजप संधी मिळेल तेथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करीत आहेत. महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयकावर चर्चेदरम्यान भाजपच्या आमदारांनी ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली मात्र, शिंदे गट तुलनेने मवाळ होता.

Vidhan Bhavan
Maharashtra Monsoon Session 2023 : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दहा हजार द्या ः चव्हाण

पावसाळी अधिवेशनावर खरीप हंगामाचे पडसाद असतात. पाऊस कमी झाला, अतिवृष्टी झाली तर दोन्ही सभागृहात त्यावर जोरदार चर्चा होते. यंदा माजी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी टाकलेले वादग्रस्त छापे आणि अन्य प्रकरणे ऐरणीवर होती. मात्र, खांदेपालट झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सूत्रे स्वीकारली आणि आपल्या वक्तृत्वाची छाप त्यांनी सभागृहात पाडत अनेक विषयांना कात्रजचा घाट दाखविला.

Vidhan Bhavan
Maharashtra Monsoon Session 2023 : पीकविमा न मिळालेल्या प्रकरणांची फेरपडताळणी

कृषी विभागाचा कुठलाही प्रश्न आला तरी एक रुपयांत पीक विमा, ‘नमो’ योजना, बोगस बियाणे आणि खत विक्रीविरोधातील प्रस्तावित कायदा अशा योजनांची शब्दफेक करून विरोधकांवरच मुंडे यांनी निशाना साधला. मात्र, मुंडे यांच्या धावत्या गाडीला ब्रेक लावण्याचे काम शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी केले.

‘‘तुमचा जन्म २ जुलैचा (मंत्रिपदाची शपथ) आणि तुम्ही आम्हाला या योजना शिकवत आहात. काल इकडे होतात आज तिकडे गेलात म्हणून टिंगल करू नका, लोक तुमची टिंगल करतील.’’ अशा शब्दांत फटकारले, तेव्हा कुठे मुंडे यांची गाडी रुळावर आली.

काँग्रेसची एकजूट

अधिवेशन सुरू झाल्यापासून पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत बसणारे काँग्रेसचे सदस्य कमालीचे आक्रमक आहेत. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड हे नेते अभ्यासू बोलतात. अनेकदा एकजुटीने विरोधकांवर हल्ला करतात. कधी नव्हे ती काँग्रेसमधील एकजूट विरोधकांनाही खुपू लागली आहे. मात्र, सभागृहातील एकजूट बाहेर आहे का, याबाबत मात्र शंका घेण्यास वाव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com