Maharashtra Monsoon Session 2023 : पीकविमा न मिळालेल्या प्रकरणांची फेरपडताळणी

Crop Insurance : संबंधित ११ हजार शेतकऱ्यांना चुकीचा कमी विमा मिळाला किंवा मिळालाच नाही, याबाबत फेरतपासणी करण्याचे निर्देश विभागाला दिले असल्याचे मुंढे यांनी जाहीर केले.
Vidhan Bhavan
Vidhan BhavanAgrowon
Published on
Updated on

बाळासाहेब पाटील

Mumbai News : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले व ७२ तासांत सूचना न दिल्याने भरपाई मिळाली नाही, अशा प्रकरणांची फेरतपासणी करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी विधानसभेत दिले.

बुलडाणा जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर सुमारे ३ लाख शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले होते.

मात्र पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीच्या नियमानुसार ७२ तासांच्या आत न कळविल्याने किंवा अन्य कारणांनी सुमारे ११ हजार शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही, किंवा अत्यंत त्रोटक विमा रक्कम मिळाली, असा मुद्दा आमदार श्‍वेता महाले यांनी उपस्थित केला. संबंधित ११ हजार शेतकऱ्यांना चुकीचा कमी विमा मिळाला किंवा मिळालाच नाही, याबाबत फेरतपासणी करण्याचे निर्देश विभागाला दिले असल्याचे मुंढे यांनी जाहीर केले.

राज्यात यावर्षी शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याची सुविधा राज्य सरकारने दिली आहे. याद्वारे आजपर्यंत १ कोटी १४ लाख शेतकऱ्यांनी आपला विमा भरल्याचे मुंडे यांनी सांगितले.

Vidhan Bhavan
Crop Insurance Scheme: एक रुपयात विमा हा फार्सच

पीकविमा कंपन्या मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करत महाले यांनी सरसकट मदतीची मागणी केली. अनेक ठिकाणी धुऱ्याला धुरा लागून आहे. तरीही एका शेतकऱ्याला लाखो रुपयांची भरपाई आणि दुसऱ्या शेतकऱ्याला हजार रुपयांची भरपाई ही तफावत का, असा सवाल महाले यांनी केला.

६५ मिलिमीटरच्या वर पाऊस पडला तरच एनडीआरएफच्या निकषानुसार सरसकट मदत केली जाते. मात्र, पीकविमा हा वेगळा विषय आहे. धुऱ्याला धुरा लागून आहे तरीही विम्यात तफावत आहे, अशा प्रकरणांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात येतील, असे मुंडे म्हणाले.

Vidhan Bhavan
Fruit Crop Insurance Scheme : सदोष निकषांमुळे फळ पीकविमा योजना वादात

२४२८ कोटींची विमा भरपाई

२०२२ मध्ये ९६. ६१ लाख शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरून ५७. ६४ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे ५३. ७६ लाख हेक्टर क्षेत्र बाधित, तर काढणीपश्चात ५. ८९ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. यातील नैसर्गिक आपत्तीपोटी १९९०. २९ कोटी रुपये तर काढणी पश्चात नुकसानीसाठी ४३८.३७ कोटी रुपये भरपाई मिळाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

‘पीक नुकसानीची सूचना ९२ तासांत देता यावी’

अतिवृष्टीच्या काळात पीक नुकसानीची सूचना ७२ तासांऐवजी ९२ तासांत देण्यासाठी तशी मुदत वाढवून देण्याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करू, असे आश्वासन मुंडे यांनी दिले. श्वेता महाले यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान मुंडे यांनी हे आश्वासन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com