Appasaheb Dharmadhikari : अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
Appasaheb Dharmadhikari
Appasaheb DharmadhikariAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता.८) ही घोषणा केली. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर बुधवारी रेवदंडा येथे शिंदे आणि फडणवीस यांनी धर्माधिकारी यांची भेट घेतली.
१४ मे १९४६ रोजी जन्मलेल्या डॉ. दत्तात्रेय तथा अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आध्यात्मिक बैठकांच्या माध्यमातून मोठा संप्रदाय निर्माण केला आहे.

Appasaheb Dharmadhikari
Agriculture : यंदाचा क्रांतिअग्रणी पुरस्कार डॉ. गणेश देवी यांना जाहीर

धर्माधिकारी यांनी दासबोध आणि श्रीसद्गुरू यांच्या ग्रंथांचे निरूपण केले आहे. गेली ३० वर्ष निरूपण करत असून बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठका सुरू केल्या. आदिवासी पाडे, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे काम डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रतिष्ठानने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे नियमितरीत्या आयोजन केले जाते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मितीचा प्रयत्नही संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे.

Appasaheb Dharmadhikari
Agriculture Award : डॉ. बेग यांना उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार

रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये अप्पासाहेब यांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी अप्पासाहेबांनी मोठे योगदान दिले आहे. आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी १९४३ पासून केली होती आणि हेच काम अप्पासाहेब यांनी पुढे नेले आहे. या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com