Agriculture Award : डॉ. बेग यांना उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार

रत्नागिरीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रदान
Agriculture Award
Agriculture Award Agrowon

नांदेड : येथील कापूस संशोधन केंद्राचे (Cotton Research Center) कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर समद बेग (Dr. Khijar Samad Baig) यांना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे दिला जाणारा पहिला ‘उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार’ (Agriculture Award) हा राज्य पातळीवरील पुरस्कार कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या हस्ते देण्यात आला.

Agriculture Award
Womans in Agriculture : भारतीय शेतीचा कणा आहेत महिला...

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली, जि. रत्नागिरी) झालेल्या ५० व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत बुधवारी (ता. १४) हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. कृषी संशोधनातील योगदानासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

डॉ. बेग मागील १९ वर्षांपासून कृषी संशोधनात कार्यरत आहेत. सोयाबीन व कापूस पिकातील एकूण १६ वाणांच्या विकासामध्ये त्यांनी भरीव कार्य केले आहे. सोयाबीन पिकातील ‘एमएयूएस १५८, एमएयूएस १६२, एमएयूएस ६१२ व एमएयूएस ७२५’ हे ४ वाण त्यांनी विकसित केले. देशी कापूस पिकाचे ८ व अमेरिकन कपाशीचे ४ वाण विकसित करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

Agriculture Award
Agri Tourism : कोयनेच्या कुशीतील ‘आनंद सागर’

कापूस व सोयाबीन पिकातील उत्पादन व संरक्षण तंत्रज्ञानाच्या १२ शिफारशी देण्यात त्यांचा सहभाग आहे. विविध नियतकालिकांमध्ये त्यांचे ५२ शास्त्रीय लेख, परिसंवादामध्ये ६१ सारांश लेख, कृषी विस्ताराची ६ पुस्तके व १०० पेक्षा अधिक लेख त्यांनी लिहिले आहेत. विविध ७ प्रकल्पामध्ये त्यांचा संशोधनात सहभाग आहे. त्यांनी एकूण १० पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना मुख्य मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले आहे. ‘वनामकृवि’चे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, संचालक संशोधक डॉ. दत्तप्रसाद वासकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com