Agriculture : यंदाचा क्रांतिअग्रणी पुरस्कार डॉ. गणेश देवी यांना जाहीर

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या नावाने देण्यात येणारा ‘क्रांतिअग्रणी पुरस्कार’ यंदा पुरोगामी विचारवंत व समाजसेवक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांना जाहीर झाला आहे
Agriculture
Agriculture Agrowon

कुंडल, जि. सांगली ः क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड (Dr. G. D. Bapu Lad) यांच्या नावाने देण्यात येणारा ‘क्रांतिअग्रणी पुरस्कार’ यंदा पुरोगामी विचारवंत व समाजसेवक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती आमदार अरुण लाड यांनी दिली. रविवारी (ता. ४) सांयकाळी सहा वाजता कुंडल येथे पुरस्कार वितरण होणार असून माजी राज्यपाल खासदार श्रीनावास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे.

Agriculture
Farmer Death : शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर गावकऱ्यांचा संताप

आमदार लाड म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षात आपण अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून बापूंच्या मनातील राष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या वर्षीचा ‘क्रांतिअग्रणी पुरस्कार’ देण्यात आलेले डॉ. देवी यांना जाहीर केला आहे.

डॉ. देवी हे बडोद्याच्या भाषा संशोधन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी सुरेखादेवी या ‘भाषा’ नावाची संस्था चालवत असून संस्था गुजरातमधील आदिवासी क्षेत्रात बोलीभाषांवर काम करते. इतिहासातील भाषांचे सर्वेक्षण ३०० स्वयंमसेवकांच्या मदतीने पूर्ण केले असून ते ५० खंडांमध्ये प्रसिद्ध केले आहे.

डॉ. गणेश देवी हे मराठी, गुजराती आणि इंग्रजी या तीन भाषांत लिहितात. त्यांनी साहित्यिक टीका, मानववंशशास्त्र, शिक्षण, भाषाशास्त्र, तत्त्वज्ञान यासह सुमारे नव्वद पुस्तके लिहिली व संपादित केली आहेत. त्यांच्या साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीस २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या वेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, दिलीप लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, रणजित लाड, व्ही. वाय. पाटील, डॉ. प्रताप लाड, चंद्रकांत रोकडे, कुंडलिक एडके, अनिल लाड, मुकुंद जोशी, अशोक पवार, जयवंत आवटे, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com