Mahanand Milk : ‘महानंद’ला घरघर

महानंद महासंघाने स्थिर मालमत्तेची पडताळणी, मूल्यांकन आणि अचल मालमत्तेची नोंदणी बाह्य नोंदकार किंवा मूल्यांकनकारांकडून २०२० मध्ये करून घेतली आहे.
Mahanand Milk
Mahanand Milk Agrowon

बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य दूध महासंघाची (Mahanand Milk) (महानंद) मालमत्तेत वेगाने होणारी घट, दरवर्षी वाढणारा तोटा, नवीन योजनांचा अभाव आणि पुरेशी आर्थिक तरतूद नसल्याने संपत येणारे नेटवर्थ पाहता ही संस्था पुढील दोन ते तीन वर्षांत बंद करावा लागेल, असा गंभीर शेरा लेखापरीक्षण (Audit) अहवालात देण्यात आला आहे.

Mahanand Milk
Dairy Business : इमडे यांचा दीडशे गायींचा आदर्शवत दुग्ध व्यवसाय

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Session) हा अहवाल सादर करण्यात आला असून, या अहवालात महानंदच्या कारभाराबाबत गंभीर शेरे नमूद केले आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षात महानंदची निव्वळ संपत्ती १ कोटी ९२ लाख रुपयांनी कमी झाली आहे. परंतु निव्वळ संपत्तीत प्रत्यक्ष घट १५ कोटी ४७ लाखांची झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद केले आहे. तर विविध शाखांचा तोटा २४ कोटी २९ लाखांवर गेला आहे.

महानंद महासंघाने स्थिर मालमत्तेची पडताळणी, मूल्यांकन आणि अचल मालमत्तेची नोंदणी बाह्य नोंदकार किंवा मूल्यांकनकारांकडून २०२० मध्ये करून घेतली आहे. मूल्यांकनकाराने त्या संदर्भातील अहवाल ३ ऑक्टोबर, २०२० रोजी महासंघाकडे सादर केला आहे. महासंघाने प्रत्येक वेगवेगळ्या स्थिर मालमत्तेची नोंदणी स्वतंत्र नोंदवहीत केली आहे.

Mahanand Milk
Dairy Farming: दुभत्या जनावराचा आहार कसा असावा?

त्याचे परीक्षण केले असता महासंघाने स्थिर मालमत्तेचा घसाऱ्याची गणनाही त्यांच्या लेखा धोरणानुसार केलेली नाही. त्यामुळे महानंदने सर्व स्थिर मालमत्तेची किंमत पुन्हा स्थापित करून महासंघाच्या नोंदवहीनुसार अद्ययावत करावी, अशी सूचना केली आहे. एफएआरच्या चुकीच्या घसारा गणना पद्धतीमुळे त्यांच्या अहवालावर विश्‍वास ठेवू शकत नसल्याचा शेराही लेखापरीक्षणात मारला आहे.

मूल्यांकनकाराच्या अहवालानुसार लेखा वहीतील कमतरता, अप्रचलितता यातील फरक २ कोटी ६० लाख २९ हजार रुपयांचा आहे. मात्र त्रुटींच्या नोंदी महासंघाच्या खातेवहीत केलेल्या नाहीत. महानंदने मूल्यांकन अहवालात दाखवल्याप्रमाणे आणि पुस्तकांनुसार मालमत्ता आणि तिच्या मूल्यांची तुलना करून निष्कर्ष काढत हा फरक २ कोटी ४९ लाख ८९ हजार रुपयांचा आहे असे नमूद केले आहे. मात्र ही नोंद लेखावहीत घेतलेली नाही.

Mahanand Milk
Mother Dairy : मदर डेअरीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ

राखीव निधीची तरतूद नाही

मार्च २०२२ च्या ताळेबंदानुसार महानंदचा एकूण राखीव निधी २०८ कोटी ९५ लाख रुपये आहे. त्यामध्ये १२६ कोटी ५५ लाखांची गुंतवणूक झाली आहे. या वर्षात ८२ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक कमी आहे. सहकारी संस्था नियम आणि उपविधीनुसार योग्य गुंतवणूक राखायला हवी होती ती महानंदने मागील वर्षात राखलेली नाही.

मालमत्तेबाबत गंभीर शेरे

- महासंघाने प्रत्येकी स्थिर मालमत्तेसाठी स्वतंत्र मालमत्ता नोंदवही ठेवलेली नाही.

- ३१ मार्च २०१२ पूर्वी स्थिर मालमत्तेच्या विक्रीतून ४३ लाख २३ हजार इतकी रक्कम प्राप्त केली आहे, परंतु ही रक्कम महासंघाने स्थिर मालमत्ता भंगार विक्री शीर्षकाखाली दाखविली आहे.

- मालमत्तेचा घसारा वजा जाता येणारे बाजार मूल्याची नोंद नाही.

- महासंघाने विक्री केलेल्या मालमत्तेची नोंद ही एफ.ए.आर.मधून वगळल्यामुळे घसारा वजा जाता येणारे बाजार मूल्य चुकीच्या पद्धतीने दर्शविले आहे.

- चुकीची घसारा गणना आणि ताळेबंदामध्ये दाखविण्यात आलेल्या स्थिर मालमत्तेच्या किमती प्रमाणित करता येत नाहीत.

- मालमत्तेसंदर्भात लेखापरीक्षकांना कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात न आल्याने आर्थिक विवरणपत्रावर मालमत्तेच्या विक्रीचा नेमका काय परिणाम होतो हे निश्‍चित करता आले नाही.

- प्रत्येक स्थिर मालमत्तेची स्वतंत्र माहिती यादीप्रमाणे देण्यात आली नाही

- महासंघाने २००८-०९ मध्ये केलेल्या मालमत्ता पुनर्मूल्यांकनानुसार जागा, इमारत, प्लॉट हे यंत्रसामग्रीसह गोरेगाव महानंदा डेअरीत पडून आहेत.

- एन.डी.डी.बी व डी.सी.एम.कडून हस्तांतरित करण्यात आलेली स्थिर मालमत्ता वेगळी करणे व ओळखणे याची प्रक्रिया महासंघाकडून पूर्ण झालेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com