Team Agrowon
दुधाळ जनावराच्या आहारामध्ये कोणकोणत्या खाद्याचा समावेश करावा या विषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सांगितलेल्या पुढील वेळापत्रकाचा अवलंब करावा.
- जनावर विल्यानंतर पाचव्या दिवसापासुन घुग-या ऐवजी दिड किलो खुराक शरीर पोषणासाठी द्यावा.
- उत्पादित दुधाच्या ४० टक्के प्रमाणात जास्तीचा खुराक थेाडा थोडा वाढवत नेऊन ८ – १० दिवसांत पुर्ण संतुलित आहार दयावा. - हिरवा चारा किंवा मुरघास १० - १५ किलो व खाईल तितका कडबा दयावा.
- गाय रोज १० लिटर दुध देत असेल तर ४ किलो जास्तीचा खुराक दयावा. अशा प्रकारे गाईला १.५ किलो अधिक ४ किलो असा एकुण ५.५ किलो खुराक, अर्धा - अर्धा करुन सकाळ-संध्याकाळ दयावा.
- दुभत्या म्हशीला पोषणासाठी रोज २ किलो खुराक दयावा. दुध उत्पादनाच्या ५० टक्के जास्तीचा खुराक दयावा. म्हणजे १० लिटर दुध देणा-या म्हशीस ५ किलो जास्तीचा खुराक दयावा. अशा प्रकारे २ + ५ = ७ किलो खुराक रोज सकाळ–संध्याकाळ निम्मा भाग दयावा.
- हिरवा चारा व सुकी वैरण गाई प्रमाणे दयावी. सहा लिटर दुध देणा-या म्हशीस १५ किलो डाळवर्गीय चारा जसे लुसर्न गवत, बरसीम, दशरथ, हादगा, शेवरी इ. अधिक १५ किलो कडुळ किंवा मक्याचा हिरवा चारा आणि खाईल तितका कडबा दिल्यास खुराक देण्याची आवश्यकता लागत नाही.