MAFSU : ‘माफसू’चे विद्यार्थी वापरतात ५० वर्षे जुने फर्निचर

Latest Agriculture News : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत (माफसू) राज्यातील सहा महाविद्यालये, तसेच वसतिगृहांमध्ये गेल्या ५० वर्षांत फर्निचर बदलण्यात आले नाही.
MAFSU
MAFSUAgrowon

Nagpur News : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत (माफसू) राज्यातील सहा महाविद्यालये, तसेच वसतिगृहांमध्ये गेल्या ५० वर्षांत फर्निचर बदलण्यात आले नाही. परिणामी, मोडकळीस आणि जीर्ण फर्निचरचा विद्यार्थ्यांना वापर करावा लागत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

विशेष म्हणजे हे फर्निचर बदलण्यासाठी कार्यकारी परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र त्यानंतर देखील हा प्रश्‍न मार्गी लागला नाही.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत नागपूर, मुंबई, शिरवळ, उद्‍गीर, परभणी येथे पदवी, तर अकोला येथे पदव्युत्तर महाविद्यालय आहे.

MAFSU
MAFSU Update : दोष कुणाचा, अन्याय कुणावर?

यातील मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाला १३२, नागपूर महाविद्यालयाला ७०, तर परभणी पशुवैद्यक महाविद्यालयाला स्थापन होऊन ५२ वर्षे झाली आहेत. इतक्‍या वर्षांचा कालखंड झालेला असताना या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वापरासाठी असलेले फर्निचर बदलण्यात आले नाही.

MAFSU
MAFSU : रिक्त पदे भरा; मग विद्यार्थी प्रवेशप्रक्रिया

परिणामी, मोडकळीस आलेल्या फर्निचचाच नाइलाजाने वापर करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. त्याची दखल घेत माफसूचे कार्यकारी परिषद सदस्य डॉ. संदीप इंगळे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा मुद्दा लावून धरत त्या संबंधीचे प्रशासकीय आदेश काढले.

फर्निचर बदलण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाकरीता ५० लाख रुपयांची तरतूद या आदेशात करण्यात आली आहे. परंतु या-ना त्या करणामुळे ही प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून तसूभरही पुढे सरकली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांशी निगडित हा महत्त्वाचा प्रश्‍न आजही कायम आहे.

अंतर्गत फर्निचर हे ५० वर्षे जुने आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुविधांमध्ये वृद्धी व्हावी याकरिता ते बदलण्यात यावे असा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार ५० लाख रुपयांची प्रत्येक महाविद्यालयासाठी तरतूद केली आहे. परंतु वर्षभरापासून हा मुद्दा निकाली निघाला नाही.
- डॉ. संदीप इंगळे, सदस्य, कार्यकारी परिषद माफसू, नागपूर
खासगी कंत्राटदारामार्फत फर्निचरचा पुरवठा व्हावा याकरिता प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर कारागृह प्रशासनाकडून फर्निचर खरेदीचे ठरले. परंतु त्यांच्याकडे पुरेसे फर्निचर उपलब्ध नव्हते. अर्धे फर्निचर आधी आणि अर्धे नंतर घेतल्यास त्यातही अनेक समस्या उद्‍भवणार होत्या. परिणामी हे काम रखडले.
- डॉ. नितीन कुरकुरे, कुलसचिव, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com