Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चा विळखा वाढला

राज्यात ३९ हजारांवर पशूधन बाधित, १८ हजार आजार मुक्त, १४३६ मृत्यूमुखी
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्यात ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) आजारावर नियंत्रणाचा राज्य सरकारकडून कितीही दावा केला जात असला, तरी राज्यात या आजाराने पशूधनाला चांगलाच विळखा घातला आहे. २३ दिवसांपूर्वी १४ जिल्ह्यात असलेला हा आजार जवळपास सर्व जिल्ह्यांत पोचला आहे. आतापर्यंत १४३६ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार ७ सप्टेंबर रोजी राज्यात अवघी १३२८ जनावरे बाधित (Animal) होती, तीच सप्टेंबर अखेरीस ३९ हजारांवर पोचल्याने शेतकऱ्यांची चिंता आणि नुकसान वाढले आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : नांदेडमध्ये १७१ जनावरे ‘लम्पी स्कीन’ने बाधित

पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रसाद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ‘लम्पी स्कीन’मुळे आतापर्यंत (३० सप्टेंबरअखेर) १ हजार ४३६ पशुधनाचा मृत्‍यू झाला आहे. ३१ जिल्ह्यांमधील एकूण २ हजार ८३ गावांत ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. प्रादुर्भावग्रस्त गावांतील एकूण ३९ हजार ३४१ बाधित पशुधनापैकी एकूण १८ हजार ३८१ पशुधन उपचाराने बरे झाले आहे. तर बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण १कोटी ६ लाख ६२ हजार लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील २ हजार ८३ गावातील ४९ लाख ६९ हजार पशुधन आणि परिघाबाहेरील ४४ लाख १३ लक्ष पशुधन अशा एकूण ९३ लाख ८२ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ ‘इन्सिडंट कमांडर’ नियुक्ती

आयुक्त सिंह म्हणाले,‘‘राज्यात जळगाव आणि अकोला या सर्वांत जास्त बाधित जिल्ह्यांमध्ये लसीकरण पूर्ण झाले आहे. इतर जिल्ह्यांतील बहुतांश पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रातील लसीकरण अंतिम टप्प्यात आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणाची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात एक कोटी म्हणजेच सुमारे ७० टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.’’

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या प्रतिबंधासाठी जनावरांची वाहतूक थांबवावी

राज्यातील लम्पी स्कीन आजार स्थिती...
तारीख...प्रभावित जिल्हे...बाधित जनावरे...मृत्यू...लसीकरण
७ सप्टेंबर...१४...१३२८...२२...२ लाख ४३ हजार ३२९
३० सप्टेंबर...३१...३९३४१...१४३६...९३ लाख ८२ हजार
---

देशात (१९ सप्टेंबर अखेर) ८५ हजार ६२८ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थानमध्ये ५५ हजार ४४८, पंजाबमध्ये १७ हजार ६५५, गुजरातमध्ये ५ हजार ८५७, हिमाचल प्रदेशमध्ये ४ हजार ३४७ व हरियानामध्ये २ हजार ३२१ पशुधनाचा समावेश आहे.
........

३० सप्टेंबरअखेर जिल्हानिहाय मृत्यू...
जळगाव - २१८, नगर - १४६, धुळे - २८, अकोला - २५३, पुणे - ९२, लातूर - १३, औरंगाबाद ३६, बीड ३, सातारा - १०५, बुलडाणा - १७८, अमरावती - १५९, उस्मानाबाद ४, कोल्हापूर ८१, सांगली १५, यवतमाळ २, सोलापूर १३, वाशीम - १८, नाशिक ४, जालना - १२, पालघर २, ठाणे १९, नांदेड १३, नागपूर जिल्हयात ४, हिंगोली १, रायगड ४, नंदुरबार ११. वर्धा २, एकूण १ हजार ४३६ मृत्यूमुखी.

पशुपालकांनी भीती न बाळगता खबरदारी घ्यावी. लम्पी स्कीन आजार नियंत्रणात आहे. लसीकरण वेगाने सुरू आहे. पशूधन नियमित वागणुकीत पेक्षा वेगळे वाटत असेल तर तातडीने स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. वेळेवर उपचार सुरू झाल्यास, जनावरे उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत.
- सच्चिंद्र प्रसाद सिंह, पशुसंवर्धन आयुक्त, पुणे.

... येथे करा संपर्क
आजार आणि मदतीकरिता पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.१८००- २३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेच्या १९६२ या टोल फ्री क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com