Right To Education : ‘आरटीई’ प्रवेशासाठी आज निघणार सो़डत

RTE News : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा (आरटीई) अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षण मोफत केले आहे.
Education
EducationAgrowon

Nagar News :बालकांच्या मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) (Right To Education) अंतर्गत मिळणाऱ्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठीची पालकांची प्रतीक्षा संपणार आहे. आज (ता. ५) सोडत काढली जाणार आहे. राज्यातील सोडत एकाच वेळी संगणकाच्या साह्याने काढली जाईल. त्यानंतर ती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा (आरटीई) अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षण मोफत केले आहे. या कायद्यातून विनाअनुदानित शाळांत पहिलीच्या एकूण जागांच्या २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश राखीव ठेवले जातात.

Education
Girls Education : मुलींसाठी नर्सिंग, पॅरामेडिकल, फार्मसीतील करिअर

त्यासाठी अर्ज मागवून सोडत काढली जाते. ‘आरटीई’अंतर्गत वंचित घटक आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो.

वंचित घटकातील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, दिव्यांग, अनाथ, एचआयव्हीग्रस्त, तसेच कोविड प्रभावित बालकांचा त्यात समावेश होतो.

Education
Education Policy : राज्यातील ५१६ शाळा आता होणार आदर्श

नगर जिल्ह्यात दोन हजार ८२५ जागा

नगर जिल्ह्यात २५ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटच्या तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. जिल्ह्यात ३६४ शाळा पात्र आहेत. त्यात दोन हजार ८२५ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी तब्बल नऊ हजार ८१८ जणांनी अर्ज दाखल केले.

या अर्जांसाठी १७ मार्चपर्यंत मुदत होती. परंतु सरकारने ती वाढवून २५ मार्च केली होती. त्यामुळे पालकांना अर्ज करण्यास संधी मिळाली. ९३ विद्यार्थ्यांचे अर्ज दुबार आढळून आले.

...अशी निघेल लॉटरी

राज्यातील सोडत एकाच वेळी काढली जाईल. ० ते १ किलोमीटर परिसरातील शाळांतील अर्जांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील चिठ्ठ्या काढल्या जातील. सोडत काढल्यानंतर लगेच प्रतीक्षा यादीही जाहीर केली जाईल.

तीही संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे केली जाणार असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. सोडतीनंतर किमान दोन दिवसांत हे संकेतस्थळ अपडेट होऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com