खते, बियाणे कृत्रिम टंचाई करून लूट ः संभाजी ब्रिगेड

कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलन करणार
Soybean Seeds
Soybean SeedsAgrowon

परळी, जि. बीड : खते, बियाण्यांची कृत्रिम टंचाई (fertilizer Shortage) करून शेतकऱ्यांची लूट (Farmer Loot) केली जात आहे. ही लूट थांबविण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) वतीने करण्यात आली आहे. शिवाय यावर नियंत्रण न करू शकणाऱ्या तालुका कृषी अधिकारी यांची बदली करावी. अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेडच्या निवेदानानुसार, शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू असून शेतकरी खते, बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये गर्दी करत आहेत. याच वेळी शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन खते, बियाणे विक्री करणारे व्यापारी हे सर्रास शेतकऱ्यांची अव्वाच्या सव्वा दराने बियाणे विक्री करून लूट करत आहेत. या लुटीच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने ६ जून रोजी तालुका कृषी अधिकारी, तालुका कृषी विकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानंतर वारंवार प्रशासनाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेळोवेळी माहिती देण्यात आली.

तरीही प्रशासनाने संभाजी ब्रिगेडच्या मागणीकडे दुर्लक्ष करून व्यापाऱ्यांना सहकार्याच्या भूमिकेत राहून शेतकऱ्यांची होत असलेली लूट याकडे डोळेझाक केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केला आहे. त्यामुळे यावर नियंत्रण न करू शकलेल्या तालुका कृषी अधिकारी यांची तत्काळ बदली करावी व शेतकऱ्यांची होत असलेली लूट वेळीच थांबवावी, अशी मागणीही लेखी निवेदनाद्वारे जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे संभाजी ब्रिगेडच्या वतीने केली आहे.

अन्यथा, संभाजी ब्रिगेड पुढील आठवड्यामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने बीड जिल्हा संघटक सेवकराम जाधव, तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शहराध्यक्ष विश्‍वंभर मोरे यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com