Na. Dho. Mahanor : रानकवी ना. धों. महानोर यांचा जीवनपट...

N. D. Mahanor Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि रानकवी ना. धों. महानोर यांचे गुरुवारी (ता. ३) निधन झाले.
Na. Dho.  Mahanor
Na. Dho. MahanorAgrowon
Published on
Updated on

ज्येष्ठ साहित्यिक आणि रानकवी ना. धों. महानोर यांचे गुरुवारी (ता. ३) निधन झाले. त्यांचा जीवनपट असा...

पूर्ण नाव : नामदेव धोंडो महानोर

जन्म : १६ सप्टेंबर १९४२

पळसखेड, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शिक्षण महाविद्यालयीन दोन वर्षे : पळसखेड, पिंपळगाव हरेश्वर, शेंदूर्णी, जळगाव येथे शिक्षण घेतले

ना. धों. महानोरांची साहित्य संपदा/कविता/पुरस्कार/ भूषविलेली पदे

  • रानातल्या कविता (१९६७)

  • वही काव्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन (१९७०)

  • पावसाळी कविता (१९८०)

  • अजिंठा दीर्घ कविता (१९८४)

  • प्रार्थना दयाघना (१९९०)

  • पक्ष्यांचे लक्ष थवे (१९९०)

  • पानझड (१९९७)- तिची कहाणी (१९९९)

  • गाथा शिवरायाची (१९९९)

  • जगाला प्रेम अर्पावे (२००४)

  • गंगा वाहू दे निर्मळ (२००७)

  • वाहटूळ (२०१३)

  • पळसखेडची गाणी (१९८०)

  • पुन्हा कविता (१९६५)

  • पुन्हा एकदा कविता संपादन (१९८४)

  • बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची निवडक कविता / संपादन (२०१४)

कथा, कादंबरी, ललित

  • गांधारी (कादंबरी) (१९७२)

  • गावातल्या गोष्टी (कथा, १९८२)

  • यशवंतराव चव्हाण आणि मी (१९९०)

  • पु. ल. देशपांडे आणि मी (२०००)

  • शरद पवार आणि मी (२००५)

  • ऐसी कळवळ्याची जाती (१९९४)

  • त्या आठवणींचा झोका (२००३)

  • गपसप (लोककथा संग्रह) (१९७२)

  • रानगंधाचे गारुड (पत्र व्यवहार) (२००८)

  • गाव गारूड (नाटक) (२०१२)

  • कवितेतून गाण्याकडे (२०१७)

  • रानगंध (२०२२)

शेती, पाणी, पर्यावरण

  • शेतकरी दिंडी (१९८०)

  • शेतीसाठी पाणी (१९८४)

  • सीताफळ बागेची गोष्ट (२००५)

  • दिवेलागण (२००७)

  • शेती, आत्मनाश व नवसंजीवन (२००७)

  • या शेताने लळा लाविला (२०१५)

  • विधिमंडळातून (२०१६)

  • मराठी चित्रपटांना गीतरचना

  • जैत रे जैत (१६ गीत रचना, १९७८)

  • सर्जा (१९८४) एक होता विदूषक (१३ गीत रचना, १९९३) अबोली (१९९४)

  • मुक्ता (१९९५) दोघी (१९९६)

  • थांग (२००५) मालक (२०१५)

  • उरूस (२००८) अजिंठा (२०११)

  • (दीर्घ कवितेवर चित्रपट १३ गीतरचना)

  • यशवंतराव चव्हाण चित्रपट (२०१२)

  • महाराष्ट्र शासन १२ गीतरचना, आठ चित्रपट गीतांना महाराष्ट्र शासन व इतर पुरस्कार

Na. Dho.  Mahanor
Na. Dho. Mahanor : रानकविता पोरकी झाली!

कविता व विशेष गीत रचना कॅसेट

  • रानातल्या कविता : काव्य वाचन (१९७५)

  • माझ्या आजोळची गाणी (६ कविता, १९८०)

  • दूरच्या रानात (८ कविता, २०००)

  • लिंबोणीचं लिंबू (कविता) अभिराम (२००८)

  • शेवंतीचं बन (१० गाणी, २००१)

  • गाथा शिवरायाची (२००४)

  • पालखीचे अभंग (२००५)

  • रानातला गंध ओला (२००५)

  • महाराष्ट्र कवी गौरव (२००४)

  • ‘जळली तुझी प्रीत’ (२०००)

  • रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज (२०११)

  • गंध मातीचा म्युझिकल सीडी (२०१४)

  • जरा अस्मान झुकले (२०१५)

  • नाव माझं शामी (२०१६)

  • श्रीमती लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ, पं. सत्यशील देशपांडे, श्रीधर फडके, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, कौशल इनामदार, अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे, शंकर महादेवन, श्रेया घोषाल, सुलोचना चव्हाण, आनंद मोडक इ. गायक, गायिका संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या अंदाजे १५० कविता- गाणी.

सांस्कृतिक क्षेत्रातील नियुक्ती

  • महाराष्ट्र शासन ः राज्यपाल नियुक्त (१९७८-८४) कलावंत आमदार, विधान परिषद मुंबई २ वेळा (१९९०-९५)

  • महाराष्ट्र शासन चित्रपट, नाट्य व सांस्कृतिक कार्य सदस्य (१९७८-८४)

  • दक्षिण मध्य सांस्कृतिक क्षेत्र (१९८३-८६)

  • साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य (१९८४-९४)

  • विश्वकोश मंडळ सदस्य महाराष्ट्र राज्य (१९९०-९४)

  • साहित्य अकादमी, नवी दिल्ली सदस्य (१९९०-९६)

  • दुसरा कमाल जमीन धारणा कायदा (१९७५-७७)

  • सरदार सरोवर (नर्मदा, २०००-०१)

महत्त्वाच्या साहित्य संस्था, महामंडळ

  • अध्यक्ष पहिले अखिल भारतीय जल साहित्य संमेलन, नागपूर (२००१)

  • अध्यक्ष पहिले अखिल भारतीय पर्यावरण साहित्य संमेलन, पुणे (२००१)

  • अध्यक्ष पहिले अखिल भारतीय साहित्य महामंडळ, महाराष्ट्र (१९८३-८४)

  • अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद (१९८३-८६)

  • अध्यक्ष बाल कवी जन्मशताब्दी, (इंडियन एक्स्प्रेस व रसिक मुंबई, १९९०)

  • अध्यक्ष कवी गिरीश जन्मशताब्दी, (वसंतराव कानेटकर, पु. ल. देशपांडे आयोजित पुणे, १९९५)

  • अध्यक्ष समाजकार्य परिवर्तन साहित्य संमेलन उंडाळे, कराड जि. सातारा (१९९५)

  • अध्यक्ष ७ वे ग्रामीण साहित्य संमेलन निमसिरगाव, कोल्हापूर (२००३)

  • अध्यक्ष रिव्रस्त्री साहित्य संमेलन, वसई (२०००)

  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - कवि संमेलनाचे अध्यक्षपद- बार्शी, जळगाव, पुणे, नांदेड, परभणी, आळंदी, औरंगाबाद, नाशिक, सांगली इ. उपाध्यक्ष - जागतिक मराठी परिषद (१९८८-९६)

  • पु. ल. देशपांडे कला अकादमी सदस्य, महाराष्ट्र राज्य (१९९३-९६)

  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, संस्थापक सदस्य, विश्वस्त (१९८४)

  • महात्मा गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव, विश्वस्त, सदस्य (२०१६)

Na. Dho.  Mahanor
Na. Dho. Mahanor : अख्ख्या महाराष्ट्राला लळा लावणारा रानकवी

साहित्य संमेलने, काव्य वाचन

  • १ जुलै ते १० जुलै १९८७

  • अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बृहन्महाराष्ट्र साहित्य संमेलन, न्यूज पाहुणे- काव्य वाचन - मुलाखत इ. दोनही ठिकाणी, कवी गौरव

  • मॉरिशस दुसरे मराठी साहित्य, संमेलन सहभाग (१९९१)

  • इस्राईल, इजिप्त जागतिक अॅग्रिटेक सहभाग (१९९२)

  • जागतिक ‘वाल्मीक’ कवी संमेलन दिल्ली सरकार ४१ देशातील कवींचा सहभाग, काव्यवाचन राष्ट्रपती झैलसिंग यांच्या हस्ते सत्कार (१९८४)

  • अखिल भारतीय महामंडळाचे चौथे विश्व साहित्य संमेलन- कॅनडा, आफ्रिका (जोहान्सबर्ग) सन्मानाने अध्यक्षपद दिले. नम्रतापूर्वक नाकारले (२०१२)

  • अध्यक्षपद यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी साहित्य संमेलन, फलटण महाराष्ट्र शासन (२०१२)

  • सामाजिक कृतज्ञता निधी, संस्थापक सदस्य, विश्वस्त १५ वर्षे, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, बाबा आढाव यांच्यासोबत

  • उद्‌घाटक : पहिले बहिणाबाई जन्म शताब्दी साहित्य संमेलन, असोदा (१९८०)

  • उद्‌घाटक : १४ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन श्रीगोंदा- नगर (२०००)

  • उद्‌घाटक : अखिल भारतीय अस्मिता... दलित साहित्य संमेलन, परभणी (२०१०)

  • उद्‌घाटक : अखिल भारतीय आदिवासी भटके विमुक्त धनगर साहित्य संमेलन, लातूर (२०१७)

  • उद्‌घाटक ः ८३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे (२००८)

  • उद्‌घाटक : ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उस्मानाबाद (२०२०)

महाराष्ट्र शासन, भारत सरकार बहुमान - गौरव

  • ‘पद्मश्री’ भारत सरकार दिल्ली साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे लेखन (१९९१)

  • ‘साहित्य अकादमी’ दिल्ली साहित्य क्षेत्रातील बहुमोल लेखनासाठी नवी दिल्ली, सन्मान (२००)

  • ‘कृषिभूषण’ महाराष्ट्र शासन शेतीच्या क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार- सुवर्णपदक (१९८५)

  • ‘वनश्री’ महाराष्ट्र शासन वनीकरण, सामाजिक वनीकरण पडीक जमीन- पर्यावरण यासाठीचे कार्य (१९९१)

  • ‘कृषिरत्न’ महाराष्ट्र शासन डॉ. पंजाबराव देशमुख सुवर्ण पदक कृषी व पाणलोट क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्दल (२००४)

  • विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन (२०१३)

  • ‘गदिमा प्रतिष्ठान’ पहिला गौरव पुरस्कार कविता, गीत लेखनासाठी बहुमोल कार्य (१९७८)

  • यशवंतराव चव्हाण सामाजिक कार्य पुरस्कार, बीड (१९९२)

  • वसंतराव नाईक कृषिगौरव पुरस्कार पुसद- मुंबई (१९८८)

  • संत नामदेव पुरस्कार (१९९८)

  • आचार्य प्रल्हाद केशव अत्रे पुरस्कार, सासवड (२००५)

  • ‘मराठवाडा भूषण’ गौरव पुरस्कार, मुंबई (२००४)

  • अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद (२०११)

  • भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ- जीवन गौरव (२०१४)

  • सलग तीन वर्षे विदूषक, मुक्ता, दोघी या चित्रपट गीतांना पुरस्कार. महाराष्ट्र शासन उत्कृष्ट गीतांना पुरस्कार महाराष्ट्र शासन उत्कृष्ट गीतरचनेबद्दल चित्रपट महामंडळाकडून विशेष गौरव सन्मान पुरस्कार.

  • भावसरगम’ पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या या कार्यक्रमास पंचवीस वर्षे झाली. त्यानिमित्त श्रीमती लता मंगेशकर यांच्या हस्ते भव्य समारंभात विशेष गौरव पुरस्कार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com