Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देऊ

अवकाळी व परतीच्या पावसाने जिल्ह्यातील ३ हजार १०७ हेक्टर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी, ज्वारी अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Crop Damage Compensation
Crop Damage Compensation Agrowon

कोल्हापूर : अवकाळी व परतीच्या पावसाने (Heavy Rain) जिल्ह्यातील ३ हजार १०७ हेक्टर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या भात (Paddy), सोयाबीन (Soybean), भुईमूग, नाचणी, ज्वारी अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले. या महिनाअखेर शासनाकडे अहवाल सादर करून शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी दिले.

Crop Damage Compensation
Crop Damage : मराठवाड्यात नुकसान क्षेत्र पोहोचले ३० लाख हेक्टरवर

श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात अवकाळी व परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथील छत्रपती शाहूजी सभागृहात आढावा बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी, जिल्हा नियेाजन विभागाचे श्री. इनामदार, कृषी पर्यवेक्षक संजय सुतार आदी उपस्थित होते.

श्री. केसरकर यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचा आढावा घेऊन महिनाअखेर शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचा पर्यटन विकास, रंकाळा संवर्धन, राधानगरी पर्यटन विकास, लोकराजा शाहू महाराज वारसास्थळे आदी तसेच जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या. याबरोबरच जिल्ह्यातील शाळांची दुरुस्ती, पोलिसांची वाहने व निवासस्थाने, जिल्ह्यात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही श्री. केसरकर यांनी केल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com