Lepoard Attack
Lepoard AttackAgrowon

Leopard Attack : गिरणा पट्ट्यात बिबट्याचा उपद्रव सुरूच

शिवारातील पाटचारीलगत असलेल्या शेतात वासराचा फडशा पाडल्याची घटना नुकतीच घडली. या बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Published on

जि. जळगाव ः गिरणा परिसरात (Girna Belt) थैमान घातलेल्या बिबट्याचे पशुसंहाराचे (Animal Slaughter) सत्र सुरूच ठेवले आहे. बिबट्याने लोंढे (ता. चाळीसगाव) शिवारातील पाटचारीलगत असलेल्या शेतात वासराचा फडशा पाडल्याची घटना नुकतीच घडली. या बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा,

Lepoard Attack
Sugar Mill : नॅचरल उद्योग समूह पंधरा टक्के लाभांश

अशी मागणी जोर धरू लागली आहे. वरखेडे पाठोपाठ लोंढे शिवारात बिबट्याचे पशुधनावरील हल्ले सुरूच आहेत. लोंढे येथे आठवडाभरात बिबट्याचा हा चौथा हल्ला आहे. लोंढे येथील देवराम चौधरी यांच्या पाटचारीलगत असलेल्या शेतात बिबट्याने वासरांचा फडशा पाडला.

श्री. चौधरी शेताकडे गेले आज पहाटे असता वासरू रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत पाहून एकदम घाबरून गेले. या भागातील बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला आहे. शिकारीच्या अपेक्षेने बिबट्या पिंजऱ्यात अडकेल,

अशी अपेक्षा फोल ठरली आहे. वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावरील कळवाडी फाट्याजवळ गुरुवारी (ता. २९) सकाळी रस्त्यावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती चाळीसगाव वन

विभागाला कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र बिबट्याचा मृत्यू वाहनांच्या धडकेत झाला असल्याची माहिती वन विभागाने दिली. दरम्यान हा बिबट्याचा मृत्यू मालेगाव हद्दीत झाला असल्याने त्या बिबट्याचा अंत्यविधी मालेगाव वन विभागाने केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com