Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात २४ तासांत फक्त १ इंचाने पाणी वाढलं, राधानगरीचा एक दरवाजा बंद

Radhanagari Dam : राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) पाच पैकी एक दरवाजा बंद झाल्याने दिलासा मिळाला आहे.
Kolhapur Rain
Kolhapur Rainagrowon
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या २४ तासांत पावसाची रिपरीप सुरू आहे. परंतु मागच्या २४ तासांपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी फक्त १ इंचाने वाढली आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी ११ पर्यंत ४० फूट ६ इंचावर स्थिर आहे. यातच राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) पाच पैकी एक दरवाजा बंद झाल्याने दिलासा मिळाला आहे.

राधानगरी धरणाचे काल २६ जुलै २०२३ रोजी ५ स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर भोगावती नदीतून ८५४० क्यूसेक पाण्याचा प्रवाह पंचगंगा नदीच्या दिशेने सुरू होता. दरम्यान यातील एक दरवाजा बंद झाल्याने १४०० क्युसेक्सने विसर्ग कमी झाला आहे. मागच्या २४ तासांत झालेल्या पावसाने राधानगरी धरण जवळपास १०० टक्के भरले आहे.

काल धरणातून सुटलेल्या पाण्याच्या पातळीचे विविध बंधाऱ्यावर मोजमाप होत आहे. आज २७ जुलै २०२३ सकाळी ८ पर्यंत तारळे बंधारा येते ६ फूट, शिरगाव बंधारा येथे ९ फूट आणि राशिवडे बंधारा येथे २ फूट ६ इंच पाणी पातळी वाढली आहे.

तर हळदी, कोगे आणि राजाराम बंधारा येथे पाणी पातळी स्थिर आहे. पावसाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे सध्या तरी या पाणी पातळी काही प्रमाणातच वाढ होईल. पण, भीतीदायक वाढ होणार नाही, असे सध्याचे चित्र आहे.

घाट माथ्यांसह सर्वच ठिकाणी पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात ८१ बंधारे पाण्याखाली आहेत. याचबरोबर हवामान खात्याने आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ३० जुलै रविवारपासून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर संभाव्य पुराचा धोका ओळखून काही भागातील लोकांचे स्थलांतर सूरू आहे.

Kolhapur Rain
Kolhapur Flood : कोल्हापुरकरांना महापुराची धास्ती, वाहने लावली थेट रस्त्यांवर

जिल्ह्यातील ८१ बंधारे पाण्याखाली

शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ शिरगांव, तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, बालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे, करंजफेण, कुंभेवा सुळेरान, दाभिळ, साळगांव, चांदेवाडी, ऐनापूर, हरळी, गिजवणे, निलजी, खणदाळ

पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरूपली, चिखली, गारगोटी, म्हसवे, शेणगांव कळे, शेनवडे, बेतवडे, मांडुकली, सांगशी, असळज चिंचोली, माणगांव, तांदुळवाडी, कोडोली, खोची, शिगांव, मांगले सावार्डे

भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सवते सावर्डे, सरूड पाटणे कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकरे, न्हावेली, कोवाड, माणगांव, ढोलगरवाडी दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली, बाचणी सुळे, आंबर्डे, बीड, आरे हे बंधारे पाण्याखाली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com