Pashu Kisan Credit Scheme : पशु किसान क्रेडिट योजना माहिती आहे का? ६ बँकां देणार अल्प दरात कर्ज

Pashu Kisan Credit Loan : तुम्हाला हा फॉर्म परत त्याच शाखेत जमा करावा लागेल. अशा प्रकारे, कमी व्याजदरात या योजनेंतर्गत जनावरांसाठी कर्ज मिळू शकते.
Cow, Bufflao
Cow, Bufflaoagrowon
Published on: 
Updated on: 

Farmers Scheme : सध्या निव्वळ शेतीवर अवलंबून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी गाई आणि म्हैशींसोबत शेतीपूरक जोडधंद्याकडे वळत चालला आहे. दरम्यान याबाबत सरकारही योग्य ती पावले उचलत आहे. सरकार पशु किसान क्रे़डिट योजनेअंतर्गत गुरांवर कर्ज उपलब्द करून देत आहे. यामध्ये देशातील ६ नामांकीत बँकांचा समावेश केला आहे.

ज्या शेतकऱ्यांना आपल्या गुरांवर कर्ज घ्यायचे आहे, त्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागतो. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करण्याची पद्धत आहे. तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जवळच्या बँकेच्या शाखेतून या योजनेचा फॉर्म आणावा लागेल.

त्यानंतर त्यात विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. आता या फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. तुम्हाला हा फॉर्म परत त्याच शाखेत जमा करावा लागेल. अशा प्रकारे, कमी व्याजदरात या योजनेंतर्गत जनावरांसाठी कर्ज मिळू शकते.

अशी असेल कर्ज वाटपाची पद्धत

दरम्यान तुम्ही पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत तुम्हाला कर्जाचा पुरवठा होणार आहे. यामध्ये गाय खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला सरकारकडून ४० हजार रुपयांचे बँक कर्ज मिळू शकते. तर म्हशीसाठी ६० हजार रुपयांचे कर्ज घेता येते. याशिवाय शेळ्या, कोंबड्यांसह लहान जनावरांवरही या योजनेंतर्गत कर्ज मिळते.

या योजनेअंतर्गत मेंढ्या किंवा शेळ्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून ४ हजार रुपयांचे कर्ज मिळते. तर तुकोंबडीसाठी ७०० रुपये प्रति कोंबडी या दराने कर्ज घेऊ शकता. एवढेच नाही तर वराह पालन खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत तुम्हाला १६ हजार रुपयांचे कर्ज मिळू शकते.

Cow, Bufflao
Nashik DCC Bank : नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न छगन भुजबळांनी तरी सोडवावा ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

या बँकांकडून कर्ज मिळेल

देशातील अनेक बँका पशु किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना कर्ज देतात, या बँकांमध्ये शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या प्रमुख बँका खालीलप्रमाणे आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, ICICI बँक या बँकांकडून कर्जाचा पुरवठा केला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com